शेतकऱ्यांना ६१ कोटींची दुष्काळी मदत वितरित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2019 01:11 PM2019-09-14T13:11:09+5:302019-09-14T13:11:13+5:30

तहसील कार्यालयांमार्फत दुष्काळी मदतीची रक्कम शेतकºयांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे.

61 crore drought relief to farmers distributed | शेतकऱ्यांना ६१ कोटींची दुष्काळी मदत वितरित!

शेतकऱ्यांना ६१ कोटींची दुष्काळी मदत वितरित!

googlenewsNext

अकोला: गतवर्षी दुष्काळ जाहीर करण्यात आलेल्या जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त पाच तालुक्यातील शेतकऱ्यांना चवथ्या टप्प्यातील दुष्काळी मदत वाटप करण्यासाठी ६१ कोटी ४९ लाख ७५ हजार रुपयांचा निधी शासनामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाला असून, उपलब्ध मदत निधी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जिल्ह्यातील पाच तहसील कार्यालयांना वितरित करण्यात आला असून, तहसील कार्यालयांमार्फत दुष्काळी मदतीची रक्कम शेतकºयांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे.
गतवर्षी शासनामार्फत जाहीर करण्यात आलेल्या दुष्काळी तालुक्यांच्या पहिल्या यादीत अकोला जिल्ह्यातील अकोला, बार्शीटाकळी, तेल्हारा, बाळापूर व मूर्तिजापूर या पाच तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला होता. दुष्काळग्रस्त पाच तालुक्यातील शेतकºयांना मदत वाटप करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत १९९ कोटी रुपये मदत निधीची मागणी शासनाकडे करण्यात आली होती. त्यानुसार शासनामार्फत मंजूर करण्यात आलेल्या मदतीच्या रकमेपैकी तीन टप्प्यात १३७ कोटी ६१ लाख २ हजार ४५६ रुपयांचा मदत निधी प्राप्त झाला होता. उपलब्ध दुष्काळी मदत दुष्काळग्रस्त शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली. उर्वरित चवथ्या टप्प्यातील ६१ कोटी ४९ लाख ७५ हजार रुपयांची दुष्काळी मदत प्रलंबित होती. अखेर १० सप्टेंबर रोजी ६१ कोटी ४९ लाख ७५ हजार रुपयांची दुष्काळी मदत शासनामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाली. उपलब्ध मदत निधी १३ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जिल्ह्यातील अकोला, बार्शीटाकळी, तेल्हारा, बाळापूर व मूर्तिजापूर या पाचही तहसील कार्यालयांना वितरित करण्यात आली. तहसील कार्यालयांमार्फत दुष्काळी मदत शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.

तालुकानिहाय अशी वितरित करण्यात आली मदत!
जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जिल्ह्यातील पाच तालुक्यातील शेतकºयांसाठी ६१ कोटी ४९ लाख ७५ हजार रुपयांची दुष्काळी मदत संबंधित पाच तहसील कार्यालयांना वितरित करण्यात आली. त्यामध्ये अकोला तालुका-१६ कोटी २५ लाख ७ हजार ५१७ रुपये, बार्शीटाकळी तालुका-१० कोटी १३ लाख ३१ हजार २७४ रुपये, तेल्हारा तालुका-९ कोटी ५९ लाख १२ हजार ७९७ रुपये, बाळापूर तालुका-१२ कोटी ५१ लाख ९१ हजार २४५ रुपये व मूर्तिजापूर तालुक्यातील शेतकºयांसाठी १२ कोटी ९९ लाख ६४ हजार ५१४ रुपयांचा मदत निधी वितरित करण्यात आला आहे.

 

Web Title: 61 crore drought relief to farmers distributed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.