देशी, विदेशी दारूच्या ६२ बाटल्या जप्त; सहा आरोपींना अटक
By admin | Published: June 12, 2016 02:45 AM2016-06-12T02:45:01+5:302016-06-12T02:45:01+5:30
खदान पोलिसांची कारवाई.
अकोला : अवैधरीत्या देशी, विदेशी दारूचा व्यवसाय करणार्या सहा जणांविरुद्ध खदान पोलिसांनी शनिवारी दुपारी कारवाई केली. कारवाईदरम्यान पोलिसांनी आरोपींकडून देशी, विदेशी दारूच्या ६२ बाटल्या जप्त केल्या.
खदान पोलिसांना खडकी व ख्रिश्चन कॉलनी परिसरातील काही आरोपी देशी, विदेशी दारूची अवैधरीत्या विक्री करीत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी सुरुवातीला खडकीतील श्रद्धानगरात छापा घालून, आरोपी दीपक वामन खंडारे याच्याकडून देशी, विदेशी दारूच्या ३८ बाटल्या जप्त केल्या. या बाटल्यांची किंमत २८00 रुपये आहे. खदान पोलिसांनी दुसरी कारवाई खदान परिसरातील ख्रिश्चन कॉलनीत केली. आरोपी योगेश जयवंतराव इंगळे, श्याम चतुरसिंग साठे, रितेश विष्णू मडावे, संदीप मेहंगे आणि नंदू नागे हे दारूचा अवैध व्यवसाय करीत असल्याने, पोलिसांनी त्यांना अटक केली. त्यांच्याकडून पोलिसांनी देशी, विदेशी दारू व बीअरच्या २४ बाटल्या जप्त केल्या. आरोपींना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका केली.