६४ हजार विद्यार्थ्यांना मिळणार गणवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 04:34 AM2020-12-12T04:34:59+5:302020-12-12T04:34:59+5:30

अकाेला : समग्र शिक्षा अभियानांतर्गत जिल्ह्यातील पहिली ते आठवीच्या पात्र ६४ हजार ५१३ विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक शालेय गणवेश ...

64,000 students will get uniforms | ६४ हजार विद्यार्थ्यांना मिळणार गणवेश

६४ हजार विद्यार्थ्यांना मिळणार गणवेश

Next

अकाेला : समग्र शिक्षा अभियानांतर्गत जिल्ह्यातील पहिली ते आठवीच्या पात्र ६४ हजार ५१३ विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक शालेय गणवेश लवकरच मोफत मिळणार आहे. यासाठी शासनाकडून पहिल्या टप्प्यात १ कोटी ८ लाख ३६ हजारांचा निधीही मिळाला आहे.

विद्यार्थ्यांची १०० टक्के उपस्थिती टिकविणे, गळतीचे प्रमाण शून्यावर आणणे, मागासवर्गीय व गोरगरीब विद्यार्थ्यांना दिलासा म्हणून समग्र शिक्षा अभियानातून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व अनुदानित शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीतील पात्र विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन मोफत गणवेश दिले जातात. यंदा कोरोनामुळे राज्यासमोर आर्थिक संकट उभे ठाकल्याने पात्र विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक गणवेश दिला जाणार आहे. एका गणवेशासाठी ३०० रुपये याप्रमाणे शासनाकडून जिल्ह्याला निधी मिळाला आहे. जिल्हास्तर व पंचायत समिती स्तरावरून शाळा व्यवस्थापन समितीकडे निधी वितरण केले जाणार आहे.

(प्रतिनिधी)

गणवेशासाठी शासनाने तीन काेटी ८७ लाख रुपये मंजूर केले. त्यापैकी एक काेटी आठ लाख रुपये मिळाले आहेत या निधीतून विद्यार्थ्यांना एक गणवेशाचे अनुदान दिले जाईल, उर्वरित अनुदान दुसऱ्या टप्प्यात देण्यात येईल. काेराेनामुळे शाळा बंद असल्याने घरपाेच गणवेश वितरणाबाबतही नियाेजन करण्याचे निर्देश आहेत.

- सुवर्णा नाईक

सह. कार्यक्रम अधिकारी समग्र शिक्षण

जिल्हा परिषदेला १.०८ कोटींचा निधी मिळाला

समग्र शिक्षा अभियानांतर्गत पहिली ते आठवीच्या पात्र विद्यार्थ्यांना दोन गणवेश दिले जातात. यंदा एका गणवेशासाठी जिल्हा परिषदेला एक कोटी ८ लाख ३६ हजार रुपयांचा निधी मिळाला आहे. हा निधी शाळा व्यवस्थापन समितीच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे. व्यवस्थापन समित्या गणवेश खरेदी करतील.

विद्यार्थ्यांपर्यंत घरपोच पोहोचणार गणवेश

कोरोनामुळे प्राथमिक शाळेतील वर्ग बंद आहेत. शाळा कधी सुरू होतील हे सध्यातरी अनिश्चित आहे. गणवेशासाठी शासनाकडून निधी प्राप्त झाल्याने पात्र विद्यार्थ्यांना लवकरच एक गणवेश दिला जाणार आहे. शाळा बंद असल्याने आणि कोरोनामुळे यंदा विद्यार्थ्यांना घरपोच गणवेश वाटप केले जाणार असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले.

Web Title: 64,000 students will get uniforms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.