भाषेत ६५,  तर गणितात ६९ टक्क्यांनी अध्ययन स्तर उंचावला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 04:38 PM2018-06-26T16:38:41+5:302018-06-26T16:41:36+5:30

चौथ्या टप्यात जिल्ह्यातील ९७५ प्राथमिक शाळांचा अध्ययन स्तर उंचावला असून, यात मुर्तिजापूर तालुक्यातील मुलेच हुश्शार असल्याचे समोर आले आहे.

65 percent of the language, and 69 percent in mathematics | भाषेत ६५,  तर गणितात ६९ टक्क्यांनी अध्ययन स्तर उंचावला!

भाषेत ६५,  तर गणितात ६९ टक्क्यांनी अध्ययन स्तर उंचावला!

Next
ठळक मुद्देअध्ययन स्तर ठरविण्यासाठी चार टप्यात इयत्ता पहिली ते पाचवीत शिकणाºया विद्यार्थ्यांसाठी कृती कार्यक्रम राबविला होता. स्तर निश्चितीची माहिती संबंधित वर्ग शिक्षकाने घेऊन माहिती शाळेच्या शेरेबुकात नोंद केली आहे.जिल्ह्यातील ९७५ शाळांमधील विद्यार्थ्यांचा भाषेमध्ये ५४.७८ टक्क्यावरून ६५.७३ टक्क्यावर अध्ययन स्तर उंचावला.

- नितीन गव्हाळे

 अकोला: प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली ते पाचवीमध्ये शिकणाºया विद्यार्थी १00 टक्के प्रगत झाले पाहिजेत. या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांचा अध्ययन स्तर ठरविण्यासाठी शिक्षण विभागामार्फत कृती कार्यक्रम चार टप्प्यांमध्ये राबविण्यात आला. चौथ्या टप्यात जिल्ह्यातील ९७५ प्राथमिक शाळांचा अध्ययन स्तर उंचावला असून, यात मुर्तिजापूर तालुक्यातील मुलेच हुश्शार असल्याचे समोर आले आहे. अकोला तालुक्याने द्वितीय तर बार्शिटाकळी तालुक्याने स्थान पटकावले आहे. असे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.
जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेने जिल्हा परिषद प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचा भाषा व गणित विषयातील अध्ययन स्तर ठरविण्यासाठी चार टप्यात इयत्ता पहिली ते पाचवीत शिकणाºया विद्यार्थ्यांसाठी कृती कार्यक्रम राबविला होता. या कृती कार्यक्रमादरम्यान सात तालुके व एक मनपा क्षेत्रातील सर्व शाळांतील विद्यार्थ्यांचा अध्ययन स्तर गटशिक्षणाधिकारी शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, विषय साधन व्यक्ती यांनी निश्चित केला. तसेच जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेचे प्राचार्य, वरिष्ठ अधिव्याख्याता, अधिव्याख्याता, माध्यमिक व प्राथमिक शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी यांनी सुद्धा प्रत्येकी एका शाळेतील विद्यार्थ्यांच्या भाषा व गणित विषयाचा अध्ययन स्तर निश्चित करून त्याचा अहवाल तयार केला. स्तर निश्चितीची माहिती संबंधित वर्ग शिक्षकाने घेऊन माहिती शाळेच्या शेरेबुकात नोंद केली आहे. जिल्ह्यातील ९७५ शाळांमधील विद्यार्थ्यांचा भाषेमध्ये ५४.७८ टक्क्यावरून ६५.७३ टक्क्यावर अध्ययन स्तर उंचावला तर गणित विषयातील वजाबाकीमध्ये ५७.९६ टक्क्यांवरून ६७.९८ टक्के, भागागामध्ये ५९.९६ टक्क्यांवरून ६९.५८ टक्क्यांपर्यंत अध्ययन स्तर उंचावला आहे.

चार टप्प्यामध्ये अध्ययन स्तर निश्चितीसाठी वर्ग १ ते ५ च्या ८८१ वर्गांमध्ये कृती कार्यक्रम राबविण्यात आला. कृती कार्यक्रमादरम्यान या वर्गांमधील विद्यार्थ्यांचा भाषा व गणितातील अध्ययन स्तर कमालिचा उंचावला आहे. भाषेमध्ये ६५.७३ तर गणिताचा ६९.५८ टक्के अध्ययन स्तर उंचावला आहे.
डॉ. प्रकाश जाधव, प्राचार्य, जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था

 

Web Title: 65 percent of the language, and 69 percent in mathematics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.