थकबाकीदार ६५६६ शेतकऱ्यांना मिळू शकतो ‘वन टाइम सेटलमेंट’चा लाभ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 12:47 PM2018-12-24T12:47:41+5:302018-12-24T12:47:53+5:30

अकोला जिल्ह्यातील थकबाकीदार ६ हजार ५६६ शेतकºयांना ‘वन टाइम सेटलमेंट’ योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता आहे.

6566 farmers can get 'One Time Settlement' Benefit! | थकबाकीदार ६५६६ शेतकऱ्यांना मिळू शकतो ‘वन टाइम सेटलमेंट’चा लाभ!

थकबाकीदार ६५६६ शेतकऱ्यांना मिळू शकतो ‘वन टाइम सेटलमेंट’चा लाभ!

Next

- संतोष येलकर 
अकोला : कर्जमाफी योजनेंतर्गत मुद्दल व व्याजासह दीड लाखांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या शेतकºयांसाठी एकवेळ समझोता (वन टाइम सेटलमेंट) योजनेत दीड लाखांवरील रक्कम भरण्यास ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय शासनामार्फत १९ डिसेंबर रोजी घेण्यात आला. त्यानुसार जिल्ह्यातील थकबाकीदार ६ हजार ५६६ शेतकºयांना ‘वन टाइम सेटलमेंट’ योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता आहे.
सतत दुष्काळ आणि नापिकीमुळे कर्जबाजारी झालेल्या राज्यातील शेतकºयांना दिलासा देण्यासाठी गत २८ जून २०१७ रोजीच्या शासन निर्णयानुसार छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर करण्यात आली. या योजनेंतर्गत राज्यातील थकबाकीदार शेतकºयांना दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी घोषित करण्यात आली. त्यामध्ये मुद्दल व व्याजासह दीड लाख रुपयांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या शेतकºयांसाठी एकवेळ समझोता (वन टाइम सेटलमेंट) योजना राबविण्यात येत आहे. या योजनेत पात्र शेतकºयांना दीड लाखांवरील त्यांच्या हिश्श्याची संपूर्ण रक्कम बँकेत जमा करण्याची मुदत ३१ डिसेंबर रोजी संपुष्टात येत आहे. त्यानुषंगाने ‘वन टाइम सेटलमेंट’ योजनेत पात्र शेतकºयांसाठी त्यांच्या हिश्श्याची संपूर्ण रक्कम भरण्यास ३१ मार्च २०१९ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने १९ डिसेंबर रोजी घेतला आहे. त्यानुसार दीड लाखांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या जिल्ह्यातील ६ हजार ५६६ शेतकºयांना ‘वन टाइम सेटलमेंट’ योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता आहे.

१.२९ लाख शेतकºयांना ५५२ कोटींची कर्जमाफी!
कर्जमाफी योजनेत जिल्ह्यातील १ लाख ३८ हजार शेतकºयांनी कर्जमाफीसाठी आॅनलाइन अर्ज केले होते. त्यापैकी गत दीड वर्षांच्या कालावधीत २१ डिसेंबरपर्यंत जिल्ह्यात १ लाख २९ हजार ३५६ शेतकºयांना ५५२ कोटी ४२ लाख ७१ हजार रुपयांची कर्जमाफी देण्यात आली आहे. उर्वरित नऊ हजार शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळणे अद्याप बाकी आहे.


जिल्ह्यात दीड लाखापेक्षा जास्त थकबाकी असलेले असे आहेत शेतकरी!
जिल्ह्यात दीड लाख रुपयांपेक्षा जास्त थकबाकी असलेले ६ हजार ५६६ शेतकरी आहेत. त्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत २ हजार ९६६ शेतकरी आणि जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँकांचे ३ हजार ६०० शेतकºयांचा समावेश आहे. या थकबाकीदार शेतकºयांना ‘वन टाइम सेटलमेंट’ योजनेचा लाभ मिळू शकतो.
 

कर्जमाफी योजनेत दीड लाखांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या शेतकºयांसाठी ‘वन टाइम सेटलमेंट’ योजनेस शासनाकडून ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या योजनेचा जिल्ह्यातील ६ हजार ५६६ शेतकºयांना लाभ मिळू शकतो.
- जी. जी. मावळे,
जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था)

 

Web Title: 6566 farmers can get 'One Time Settlement' Benefit!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.