६५ वा प्राथमिक नाट्य महोत्सव : ‘काळा वजीर, पांढरा राजा’ सवरेत्कृष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2018 02:23 AM2018-01-26T02:23:46+5:302018-01-26T02:24:00+5:30
अकोला : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ अकोला विभागाच्या वतीने आयोजित ६५ व्या प्राथमिक नाट्य महोत्सवात ‘काळा वजीर, पांढरा राजा’ ला सवरेत्कृष्ट नाटकाचे पारितोषिक मिळाले. २५ डिसेंबर ते २३ जानेवारी या कालावधीत नाट्य महोत्सव प्रमिलाताई ओक हॉल येथे पार पडला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ अकोला विभागाच्या वतीने आयोजित ६५ व्या प्राथमिक नाट्य महोत्सवात ‘काळा वजीर, पांढरा राजा’ ला सवरेत्कृष्ट नाटकाचे पारितोषिक मिळाले. २५ डिसेंबर ते २३ जानेवारी या कालावधीत नाट्य महोत्सव प्रमिलाताई ओक हॉल येथे पार पडला.
उत्कृष्ट नाट्य प्रयोगाचे प्रथमपारितोषिक काळा वजीर, पांढरा राजा कामगार कल्याण केंद्र बडनेरा, नवी वस्ती संघाला मिळाले. द्वितीय क्रमांक ललित कला भवन अमरावतीच्या ‘कु.सौ.कांबळे’ नाटकाने पटकाविले. गांधी चौक अमरावती केंद्राच्या ‘खेळ’ नाटकाने तृतीय पारितोषिक पटकाविले. अकोल्याच्या हरिहरपेठ वसाहत पोळा चौक केंद्राच्या ‘फ्रेंडशिप’ आणि बुलडाणा केंद्राच्या ‘यशा राजा’ नाटकाला उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.
उत्कृष्ट दिग्दर्शनाचे प्रथम पारितोषिक गौरी अभ्यंकर यांना ‘काळा वजीर, पांढरा राजा’साठी, द्वितीय पारितोषिक विशाल तराळ यांना ‘कु.सौ.कांबळे’ करिता आणि तृतीय पारितोषिक डॉ. श्याम देशमुख यांना ‘खेळ’ या नाट्यप्रयोगासाठी देण्यात आले.
उत्कृष्ट नेपथ्यचे प्रथम पारितोषिक ‘काळा वजीर, पांढरा राजा’करिता अक्षय वैद्य यांना, द्वितीय पारितोषिक अँड. प्रशांत देशपांडे यांना ‘कु.सौ.कांबळे’ बद्दल आणि तृतीय पारितोषिक अंकुश गोतमारे व सृष्टी माटे यांना ‘फ्रेंडशीप’करिता देण्यात आले.
उत्कृष्ट पार्श्वसंगीत अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय मिलिंद कहाळे ‘काळा वजीर, पांढरा राजा’, स्वाती तराळ ‘कु.सौ. कांबळे’, संकेत बोंद्रे व सतीश ठाकरे यांना ‘खेळ’च्या प्रयोगाकरिता प्रदान करण्यात आले.
उत्कृष्ट प्रकाश योजना ऋषिकेश भागवतकर प्रथमस्थान ‘काळा वजीर, पांढरा राजा’करिता, सौरभ काळपांडे द्वितीयस्थान ‘कु.सौ.कांबळे’करिता, डॉ. श्याम देशमुख यांना ‘खेळ’ नाटकासाठी तृतीयस्थान मिळाले. उत्कृष्ट नाट्यलेखानाचे प्रथम पारितोषिक राजेश पवार यांना तांडा (ऊस तोडीचा) या नाटकाकरिता देण्यात आले. हे नाटक शिवणी अकोला केंद्राने सादर केले होते.
सवरेत्कृष्ट अभिनय महिलांमध्ये अनुक्रमे प्रथम तीन व उत्तेजनार्थ रसिका वानखडे अमरावती, वैष्णवी जोशी अकोला, संजीवनी पुरोहित अमरावती, धनश्री शेरेकर अमरावती, प्रीती शिखरे मंगरू ळपीर, अमृता जोशी-जटाळे अकोला, प्राची गोंगले दर्यापूर, गीताबाली उनवणे अकोला तसेच पुरुषांच्या गटात अँड. चंद्रकांत कर्हाळे अमरावती, वैभव देशमुख बडनेरा, विशाल तराळ अमरावती, शुभम गवई बुलडाणा, उमेश जाधव अकोला, जयंत दलाल चिखली, मयूर भालतिलक उमरी, विलास सुतार यवतमाळ, सुयश देशपांडे मूर्तिजापूर, गजानन छबिले मलकापूर, प्रकाश सावळे अकोला, विजय सोनोने अमरावती, अश्विन जगताप कारंजा यांनी पारितोषिक मिळविले.