दिवसभरात ६७ पॉझिटिव्ह, १७ कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 08:06 PM2020-12-04T20:06:54+5:302020-12-04T20:07:33+5:30
६७ पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने एकूण रुग्णसंख्या ९६०१ झाली आहे.
अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, शुक्रवार, ४ डिसेंबर रोजी दिवसभरात आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये ६१, रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यांमध्ये सहा असे एकूण ६७ पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने एकूण रुग्णसंख्या ९६०१ झाली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शुक्रवारी ३८२ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ६१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत, तर उर्वरित ३२१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये मध्यवर्ती कारागृहातील १४ जणांसह गणेश नगर छोटी उमरी येथील पाच, गोरक्षण रोड, बसेरा कॉलनी, शास्त्री नगर, रणपिसे नगर व गीता नगर येथील प्रत्येकी तीन, गणेश नगर, जुने शहर, मोठी उमरी, राम नगर व मलकापूर येथील प्रत्येकी दोन, तर भारती प्लॉट, तेल्हारा, वल्लभ नगर, जठारपेठ, आदर्श कॉलनी, किनखेड पूर्णा, अडगाव बु. ता. तेल्हारा, बाजोरिया नगर, बिर्ला कॉलनी, व्यंकटेश नगर, जीएमसी बॉय हॉस्टेल, तुकाराम चौक, न्यू जैन मंदिर, व्याळा ता. बाळापूर, कान्हेरी सरप ता. बार्शीटाकली, राउतवाडी व बाळापूर येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
१७ जणांना डिस्चार्ज
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून पाच, आयकॉन हॉस्पीटल येथून सहा, हॉटेल रिजेन्सी येथून तीन, कोविड केअर सेंटर मूर्तिजापूर येथून एक, सूर्यचंद्रा हॉस्पिटल येथून एक, तर बिऱ्हाडे हॉस्पिटल येथून एक, अशा एकूण १७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
६२६ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ९६०१ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ८६७९ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत २९६ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ६२० अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.