अकोला जिल्ह्यात सात हजारावर शेतकऱ्यांना मिळाला नाही विमा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 01:21 PM2018-08-22T13:21:26+5:302018-08-22T13:23:47+5:30
अकोला: प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत गतवर्षी जिल्ह्यात पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांपैकी ८४ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात १०२ कोटी रुपये पीक विम्याची रक्कम जमा करण्यात आली असली तरी, जिल्ह्यात सात हजारावर शेतकऱ्यांना अद्याप पीक विम्याची रक्कम मिळाली नाही.
- संतोष येलकर
अकोला: प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत गतवर्षी जिल्ह्यात पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांपैकी ८४ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात १०२ कोटी रुपये पीक विम्याची रक्कम जमा करण्यात आली असली तरी, जिल्ह्यात सात हजारावर शेतकऱ्यांना अद्याप पीक विम्याची रक्कम मिळाली नाही. त्यामुळे पीक विम्याच्या लाभापासून वंचित असलेल्या संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम केव्हा जमा होणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत गतवर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यात १ लाख ४७ हजार शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता. पीक विमा हप्त्याची रक्कम (प्रीमियम) संबंधित बँकेत जमा करून, जिल्ह्यातील शेतकºयांनी कपाशी, सोयाबीन, मूग, उडीद इत्यादी पिकांची विमा काढला. पीक विमा काढलेल्या शेतकºयांपैकी विम्याचा लाभ मंजूर झालेल्या शेतकºयांच्या बँक खात्यात पीक विम्याची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया गत ६ जूनपासून नॅशनल इश्युरन्स कंपनीमार्फत सुरू करण्यात आली. त्यामध्ये जुलै अखेरपर्यंत जिल्ह्यातील ८४ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात विमा कंपनीमार्फत १०२ कोटी रुपये पीक विम्याची रक्कम जमा करण्यात आली; परंतु यावर्षीच्या खरीप हंगामातील पेरण्या होऊन दोन महिन्यांचा कालावधी उलटून गेला तरी, गतवर्षी पीक विमा काढलेल्या जिल्ह्यातील सात हजारांवर शेतकºयांना अद्याप पीक विम्याचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे पीक विम्याच्या लाभापासून वंचित असलेल्या शेतकºयांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम केव्हा जमा होणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पीक विमा मंजूर शेतकºयांची विमा कंपनीकडे नाही माहिती!
गतवर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यात १ लाख ४७ हजार शेतकºयांनी पीक विमा काढला. त्यापैकी पीक विमा मंजूर झालेल्या शेतकºयांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया नॅशनल इश्युरन्स कंपनीमार्फत सुरू करण्यात आली. गत जुलै अखेरपर्यंत जिल्ह्यातील ८४ हजार शेतकºयांच्या खात्यात विमा कंपनीमार्फत विम्याची रक्कम जमा करण्यात आली; मात्र जिल्ह्यात गतवर्षी पीक विमा काढलेल्या शेतकºयांपैकी किती शेतकºयांना पीक विमा मंजूर करण्यात आला, यासंदर्भात नॅशनल इन्शुरन्स कंपनीच्या अकोला विभागीय कार्यालयाकडे माहिती उपलब्ध नसल्याचे कंपनीच्या सूत्रांनी सांगितले.
दोन टप्प्यात १०२ कोटींची रक्कम शेतकºयांच्या खात्यात!
पीक विम्यापोटी पहिल्या टप्प्यात ६३ कोटी आणि दुसºया टप्प्यात ३९ कोटी अशी एकूण १०२ कोटी रुपयांची पीक विम्याची रक्कम जिल्ह्यातील ८४ हजार शेतकºयांच्या खात्यात नॅशनल इन्शुरन्स कंपनीमार्फत जमा करण्यात आली.