खरीप पिकांची नजरअंदाज पैसेवारी ७0 पैसे!
By admin | Published: October 2, 2016 02:20 AM2016-10-02T02:20:18+5:302016-10-02T02:20:18+5:30
अकोला जिल्हय़ातील ९९0 गावांची पैसेवारी जाहीर!
अकोला, दि. 0१- यावर्षीच्या खरीप हंगामातील जिल्हय़ातील खरीप पिकांची नजरअंदाज पैसेवारी ३0 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी जाहीर केली. त्यानुसार जिल्हय़ातील लागवडीयोग्य ९९0 गावांतील खरीप पिकांची नजरअंदाज पैसेवारी ७0 पैसे आहे.
सन २0१६-१७ यावर्षीच्या खरीप हंगामातील खरीप पिकांची नजरअंदाज जाहीर करण्यासाठी पीक कापणी प्रयोगाच्या आधारे खरीप पिकांच्या नजरअंदाज पैसेवारीचे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जिल्हय़ातील सातही तहसीलदारांना देण्यात आले होते. त्यानुसार तहसीलदारांकडून प्राप्त प्रस्तावानुसार जिल्हय़ाची खरीप पिकांची नजरअंदाज पैसेवारी जाहीर करण्यात आली. जिल्हय़ातील अकोला, आकोट, बाळापूर, बार्शिटाकळी, पातूर, तेल्हारा व मूर्तिजापूर या सातही तालुक्यांतील एकूण १ हजार ११ गावांपैकी लागवडीयोग्य ९९0 गावांमधील खरीप पिकांची नजरअंदाज पैसेवारी ७0 पैसे असल्याचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी जाहीर केले. जिल्हाधिकार्यांनी जाहीर केलेल्या खरीप पिकांच्या नजरअंदाज पैसेवारीनुसार जिल्हय़ातील लागवडीयोग्य सर्व ९९0 गावांमधील खरीप पिकांची नजरअंदाज पैसेवारी ५0 पैशांपेक्षा अधिक म्हणजेच ७0 पैसे आहे.
गावे-तालुकानिहाय नजरअंदाज पैसेवारी!
तालुका गावे पैसेवारी
अकोला १८२ ७0
बाश्रीटाकळी १५६ ६८
आकोट १८५ ७0
तेल्हारा १0६ ६९
बाळापूर १0३ ७0
पातूर ९४ ६९
मूर्तिजापूर १६४ ७२
एकूण ९९0 ७0%