पीएम केअर फंडामधून जिल्ह्याला ७० व्हेंटिलेटर्स; यातील ४० बंदच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:18 AM2021-05-13T04:18:08+5:302021-05-13T04:18:08+5:30
आयसीयू ५० टक्के कर्मचाऱ्यांवर आयसीयुमध्ये तीन शिफ्टमध्ये डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांची ड्यूटी लावण्यात येते. त्यानुसार आयसीयूमध्ये दिवसाला १८ डॉक्टर, १८ परिचारिका, ...
आयसीयू ५० टक्के कर्मचाऱ्यांवर
आयसीयुमध्ये तीन शिफ्टमध्ये डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांची ड्यूटी लावण्यात येते. त्यानुसार आयसीयूमध्ये दिवसाला १८ डॉक्टर, १८ परिचारिका, १८ अटेंडन्स आणि १५ स्वीपरची आवश्यकता आहे, मात्र सद्य:स्थितीत आयसीयूमध्ये दिवसाला केवळ ९ डॉक्टर, ६ परिचारिका, ६ अटेंडन्स आणि ६ स्वीपर सेवा देत आहेत. गरजेच्या तुलनेत उपलब्ध मनुष्यबळ ५० टक्क्यांपेक्षा कमी आहे.
व्हेंटिलेटर स्टॉकमध्येच पडून
पीएम केअर फंडाच्या माध्यमातून प्राप्त व्हेंटिलेटरपैकी ४० व्हेंटिलेटर जसे आले तसेच पडून आहेत. तज्ज्ञ मनुष्यबळ नसल्याने या व्हेंटिलेटरचा अद्यापही वापर झालेला नाही.
रुग्णांना मात्र व्हेंटिलेटरची प्रतीक्षा
सर्वोपचार रुग्णालयात मनुष्यबळाअभावी ४० व्हेंटिलेटर वापराविनाच पडून आहेत, तर दुसरीकडे अनेक गंभीर रुग्ण व्हेंटिलेटरच्या प्रतीक्षेत आहेत. व्हेंटिलेटर मिळत नसल्याने काही रुग्णांना जीव देखील गमवावा लागत आहे.
कोठे कीती? सुरू किती?
नॉनकोविड आयसीयू - २० पैकी १८ सुरू, २ बंद
कोविड आयसीयू - ७० पैकी ३० सुरू, ४० बंद (पीएम केअर फंड)