एसटी महामंडळाला राज्यात ७०० कोटींचे देणे थकबाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2020 11:31 AM2020-07-21T11:31:17+5:302020-07-21T11:31:35+5:30

एसटी महामंडळाकडे असलेले ७०० कोटी रुपयांचे देणे अद्याप बाकी आहे.

700 crore due toward ST Corporation in the state | एसटी महामंडळाला राज्यात ७०० कोटींचे देणे थकबाकी

एसटी महामंडळाला राज्यात ७०० कोटींचे देणे थकबाकी

Next

- सचिन राऊत

अकोला : कोरोनामुळे राज्यातील परिवहन महामंडळाच्या एसटी बसेस २३ मार्चपासून बंद असल्याने तसेच मोठ्या प्रमाणात आार्थिक तूट निर्माण झाल्यामुळे एसटी महामंडळाकडे असलेले ७०० कोटी रुपयांचे देणे अद्याप बाकी आहे. कोरोनामुळे एसटीची वाट आणखीच बिकट झाली असून, यामधून बाहेर पडण्यासाठी सुरू असलेली धडपडही सध्या शून्य ठरत आहे. त्यामुळेच एसटी महामंडळाकडे कंत्राटदार, शिवशाही, डिझेल खर्च तसेच चेसीस यासह विविध बाबींपोटी झालेल्या ७०० कोटी रुपयांचे देणे बाकी आहे.
एसटीच्या काही बसेस सध्या सुरू आहेत. यामध्ये मुंबई उपनगरातील मुंबई, ठाणे, पालघर या तीन विभागातील एसटी बसेस सुरू आहेत; मात्र या तीन विभागातील एसटी बसेस केवळ अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांसाठी सुरू आहेत. या व्यतिरिक्त महामंडाळाच्या राज्यभरातील बसेस बंद असल्याने त्यांचे दिवसाला २१ कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे आधीच विविध बाबींवर झालेला खर्च तसेच कंत्राटदार व शिवशाहीचे भाडे असे ७०० कोटी रुपयांचे देणे अद्याप एसटीकडे आहे. नवीन चेसीसची खरेदी, एसटीवर झालेला तब्बल ६६ कोटी रुपयांचा डिझेल खर्च यासह देखभाल दुरुस्ती आणि इतर बाबी असा एकूण ७०० कोटी रुपये एसटीकडे थकीत असून, हे देणे त्यांना लवकरच अदा करावे लागणार आहे. आधीच एसटीची चाके १०० दिवसांपेक्षा अधिक कालावधीपासून बंद असताना या बाकी रकमेमुळे महामंडळाचा प्रवास बिकट परिस्थितीतून सुरू आहे.
 
महामंडळाच्या तिजोरीत ठणठणाट
१०० दिवसांपेक्षा अधिक कालावधीपासून एसटीची चाके थांबलेली आहेत. अशातच अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासाठी महामंडळाला पैशांची गरज असताना त्यांच्या तिजोरीत मात्र सध्या ठणठणाट आहे. त्यामुळे दैनंदिन खर्च भागविणे आणि वाहनांची देखभाल, दुरुस्ती करण्यासारखी महत्त्वाची कामेही सध्या अत्यंत कमी प्रमाणात सुरू आहेत.
 
या बाबींवर होतोय खर्च
एसटी महामंडळाचा विविध बाबींवर मोठ्या प्रमाणात खर्च होत असून, त्यामुळेच एसटी महामंडळाने विविध खर्चापोटी देणे असलेल्यामध्ये ६६ कोटी रुपये हे डिझेल खर्चाचे आहेत. तर नवीन एसटीचे चेसीस, टायर, शिवशाहीचा खर्च, ब्रिक्स, खासगी कंत्राटदार आणि ट्रायमेक्सवरील खर्चाचा आकाडा ७०० कोटी रुपयांच्या घरात आहे. यासोबतच एसटी को-आॅपरेटिव्ह सोसायटीतील कपात रक्कम आणि एसटी बँकेतील कपात रकमेचाही या देण्यामध्ये समावेश आहे.

 

Web Title: 700 crore due toward ST Corporation in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.