पोलिस दलातील ७00 कर्मचार्‍यांच्या बदल्या

By admin | Published: May 21, 2014 11:37 PM2014-05-21T23:37:52+5:302014-05-22T20:10:04+5:30

पोलिस अधीक्षक कार्यालयात हजेरीस प्रारंभ

700 police personnel transferred | पोलिस दलातील ७00 कर्मचार्‍यांच्या बदल्या

पोलिस दलातील ७00 कर्मचार्‍यांच्या बदल्या

Next

अकोला : निवडणुकीची धामधूम संपताच पोलिस दलामध्ये बदल्यांचे वारे सुरू झाले आहे. पोलिस ठाण्यांमध्ये दोन वर्ष पूर्ण केलेल्या जवळपास ७00 पोलिस कर्मचार्‍यांच्या बदल्या होणार आहेत. बदल्यासंदर्भात बुधवारपासून पोलिस अधीक्षक कार्यालयातील पोलिस कर्मचार्‍यांनी पोलिस अधीक्षक वीरेंद्र मिश्र यांच्यासमक्ष हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. बुधवारी दुपारी १५0 पोलिस कर्मचार्‍यांनी पोलिस अधीक्षक वीरेंद्र मिश्र यांच्यासमोर हजेरी लावली.
जिल्ह्यातील पोलिस ठाण्यांमध्ये कार्यरत असलेल्या पोलिस कर्मचार्‍यांना दोन वर्ष पूर्ण झाले आहेत. अशा कर्मचार्‍यांकडून पोलिस अधीक्षक कार्यालयाने बदलीसाठी अर्ज मागितले होते. त्यासाठी ३१ मार्च ही शेवटची तारीख ठेवली. त्यानंतर पुन्हा तारीख वाढविण्यात आली. जिल्ह्यामध्ये जवळपास २१00 संख्याबळ आहे. शासन नियमाप्रमाणे मंजूर संख्या बळाच्या ३0 टक्के कर्मचार्‍याच्या बदल्या करता येतात. अनेक पोलिसांनी बदलीसाठी विनंती अर्जासह प्रशासकीय बदलीच्या दृष्टिकोनातून अर्ज केले आहे. विनंती अर्जामध्ये पती-पत्नी एकत्रीकरणाचा समावेश असल्याने, अनेकांनी अर्ज केले आहेत. बुधवारी जिल्ह्यातील बदलीसाठी अर्ज केलेल्या १५0 पोलिस कर्मचार्‍यांनी पोलिस अधीक्षक वीरेंद्र मिश्र यांची भेट घेतली. भेटीदरम्यान पोलिस अधीक्षक मिश्र यांनी पोलिस कर्मचार्‍यांचा अडीअडचणी जाणून घेत, त्यांना विनंतीवरून का बदली हवी आहे. याबाबत चौकशीसुद्धा केली. चौकशीदरम्यान पोलिस अधीक्षकांना बदलीसाठी विनंती अर्ज केलेल्या पोलिस कर्मचार्‍यांची बाजू ऐकून घेतल्यानंतर त्यांची समस्या फार मोठी नसल्याने त्यांच्या सोयीनुसार बदली देता येणार नसल्याचे स्पष्ट केले आणि प्रशासकीय सोयीनुसारच बदली होईल, असे स्पष्ट केले. बदल्यांसाठी पोलिस अधीक्षक वीरेंद्र मिश्र यांच्या भेटीचा कार्यक्रम आणखी चार ते पाच दिवस चालणार आहे. २७ किंवा २८ मे रोजी पोलिस कर्मचार्‍यांच्या बदल्यांसंदर्भातील यादी तयार होईल आणि त्यानुसार पोलिस कर्मचार्‍यांच्या बदल्या करण्यात येणार आहेत. जवळपासचे पोलिस ठाणे मिळावे किंवा शहरातीलच पोलिस ठाणे देण्यात यावे, यासाठी अनेक पोलिस कर्मचारी आपआपल्या दृष्टीने प्रयत्न करीत असल्याचे समजते. 

Web Title: 700 police personnel transferred

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.