काँग्रेसचे ७१ उमेदवार रिंगणात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2017 02:24 AM2017-02-04T02:24:29+5:302017-02-04T02:24:29+5:30
आघाडी फिसकटल्यानंतर काँग्रेसने ८0 जागांसाठी निवडणुकीची तयारी केली; प्रत्यक्षात ७१ जागांवर उमेदवार उभे केले आहे.
अकोला, दि. 0४- : काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी फिसकटल्यानंतर काँग्रेसने ८0 जागांसाठी निवडणुकीची तयारी केली. प्रत्यक्षात मात्र, ७१ जागांवर उमेदवार उभे केले आहे.
काँग्रेसचे महानगराध्यक्ष बबनराव चौधरी यांनी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारांची यादी शनिवारी जाहीर केली असून त्यामध्ये माजी महापौर मदन भरगड, सुरेश पाटील, विरोधी पक्षनेता साजीद खान, डॉ. जिशान अजहर हुसेन खान, कपिल रावदेव, मब्बा खान यांच्या पत्नी, अब्दुल जब्बार, आझाद खान, अँड. इकबाल सिद्दीकी, पराग मधुकर कांबळे, माजी शहर अध्यक्ष डॉ. स्वाती देशमुख, पुष्पा गुलवाडे, राजेश मते आदींचा समावेश आहे. काँग्रेसमधील आऊटगोईंग उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंंंत कायम होते. पक्षाच्या ज्येष्ठ नगरसेविका उषा विरक यांनी ऐनवेळी पक्षाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीचा मार्ग धरला. तर उमेदवारी देताना काहींना डावलण्यात आले आहे. विद्यमान सर्वच नगरसेवकांना उमेदवारी देत असतानाच अनेक प्रभागांमध्ये पॅनलचे समिकरण जुळविताना पक्षाची चांगलीच दमछाक झाल्याचे दिसून आले.