विद्युत खांबांवरील ७१२ फलक-बॅनर्स हटविले; महावितरणची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2019 07:16 PM2019-06-11T19:16:15+5:302019-06-11T19:16:39+5:30

अकोला शहरातील मुख्य रस्त्यावरील अनेक भागात ही फलके काढण्याच्या मोहिमेला सुरुवात करण्यात आली.

712 pan-banners deleted on electric poles; Action of MSEDCL | विद्युत खांबांवरील ७१२ फलक-बॅनर्स हटविले; महावितरणची कारवाई

विद्युत खांबांवरील ७१२ फलक-बॅनर्स हटविले; महावितरणची कारवाई

Next

अकोला: विद्युत खांब व इतर विद्युत यंत्रणेवर अनधिकृतपणे लावलेले फ्लेक्स व होर्डीग्स काढण्याचे आवाहन करून कारवाई करण्याचा इशारा महावितरणने दिला होता. त्यानुसार मंगळवारी अकोला शहरातील मुख्य रस्त्यावरील अनेक भागात ही फलके काढण्याच्या मोहिमेला सुरुवात करण्यात आली. यामध्ये जवळपास ७१२ फलके काढण्यात आली. टप्याटप्याने शहरासह जिल्ह्यात ही मोहीम राबविल्या जाणार आहे.
अकोला शहरासह जिल्ह्यात महावितरणच्या विदयुत खांब, वितरण पेटी, डीपी, रोहीत्राजवळ अनेक फलक, पत्रके, फ्लक्स व बॅनर्स अनधिकृतपणे ठिकठिकाणी लावलेले आढळून येतात. त्यामुळे विदयुत यंत्रणेवर महावितरणच्या कर्मचा-यांना काम करताना अडथळा निर्माण होत असून अपघाताची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. त्यामुळे संबधितानी सदर फ्लेक्स वा साहित्य स्वत:च काढून टाकावे अन्यथा महावितरण कंपनी सदर साहित्य काढून कारवाई करणार असा इशारा महावितरण कंपनीने दिला होता.
महावितरण कंपनीचे जिल्ह्यात शहरासह वीज पुरवठा करण्यासाठी ग्रामीण भागात विद्युत वितरण यंत्रणेचे मोठे जाळे असून खांब, वाहिन्या, रोहित्र वितरण पेटया आहेत. मात्र अनेक व्यावसायिक, संस्था, जाहीरातदार अनधिकृतपणे यावर फ्लेक्स बॅनर्स, होर्डीग्स लावतात. हे लावणे बेकायदेशीर असून सोबत विद्युत अपघातास आमंत्रण देणार सुद्धा आहे. महावितरणचे तांत्रिक कर्मचारी देखभाल दुरुस्तीची कामे करीत असताना अडथळा निर्माण होतो व अपघात सुद्धा होऊ शकतो. ही मोहीम मुख्य अभियंता अनिल डोये व अधिक्षक अभियंता पवनकुमार कछोट यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता प्रशांत दाणी यांचे नेतृवाखाली अतिरिक्त कार्यकारी अभियंते, सहाय्यक अभियंते व जनमित्र यांनी पार पाडली.
यापुढे सदर साहित्यामुळे महावितरण कर्मचाऱ्यांना विद्युत अपघात झाला तर संबंधिताना जबाबदार धरण्यात येईल. विदयुत खांब, वितरण पेटी, डीपी, रोहीत्राजवळ फलक, पत्रके, फ्लेक्स, बॅनर्स वा कुठलेही प्रचार साहित्य अनधिकृतपणे लावू नये ,असे आवाहन महावितरणने केले आहे.

अशाप्रकारे हटविण्यात आली फलके
या मोहिमत उपविभाग क्रमांक १ मध्ये २१९, उपविभाग क्रमांक २ मध्ये २४३ आणि उपविभाग क्रमांक ३ मध्ये २५० असे एकूण शहर विभागामध्ये एकूण ७१२ फ्लेक्स व बॅनर्स काढण्यात आले.

 

Web Title: 712 pan-banners deleted on electric poles; Action of MSEDCL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.