कोरोनाच्या ७१७ गंभीर रुग्णांवर उपचार सुरू!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2020 10:19 AM2020-09-26T10:19:31+5:302020-09-26T10:19:47+5:30
त्यापैकी ४०९ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह, तर १०८ कोरोनाचे संदिग्ध रुग्ण असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.
अकोला : कोरोनाचे थैमान सुरू असले, तरी बहुतांश रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे किंवा लक्षणेच नसल्याचे दिसून आले; मात्र सद्यस्थितीत कोरोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णांपैकी ७१७ गंभीर रुग्णांवर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यातील ५१७ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून, त्यापैकी ४०९ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह, तर १०८ कोरोनाचे संदिग्ध रुग्ण असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.
कोरोनाच्या एकूण रुग्णांपैकी जवळपास ८० ते ८६ टक्के रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे किंवा लक्षणेच आढळून आली नाहीत. त्यामुळे या रुग्णांना संस्थात्मक विलगीकरण केंद्रात किंवा होम क्वारंटीनमध्ये ठेवण्यात आले आहे. तर दुसरीकडे कोरोनाच्या गंभीर रुग्णांवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासह शहरातील काही खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. या गंभीर रुग्णांमध्ये ५१७ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. त्यापैकी ४०९ रुग्ण कोरोनाबाधित आहेत, तर १०८ संदिग्ध रुग्ण असून, अद्याप त्यांचा अहवाल आलेला नाही. यासह १९० रुग्ण हे आॅक्सिजनवर उपचार घेत आहेत. हे सर्व रुग्णांवर सर्वोपचार रुग्णालयासह अधिग्रहित करण्यात आलेल्या ९ खासगी रुग्णालयांमध्ये उपचार करण्यात येत आहे.
अशी आहे गंभीर रुग्णांची स्थिती
‘आयसीयू’मध्ये
पॉझिटिव्ह - ४०९
संदिग्ध - १०८
———————-
सीपीएपी - २४
आॅक्सिजन - १६६
विना आॅक्सिजन (सामान्य) - २१९
सर्वोपचार रुग्णालयासह इतर खासगी रुग्णालयात गंभीर रुग्णावर आवश्यक उपचार सुरू आहे. डॉक्टरांकडून त्यांच्यावर विशेष लक्ष दिले जात आहे.
- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला