नोव्हेंबरपासून तब्बल ७२ हजार ग्राहकांनी भरले नाही एकही वीज बिल

By atul.jaiswal | Published: July 27, 2021 10:47 AM2021-07-27T10:47:16+5:302021-07-27T10:47:23+5:30

MSEDCL News : या वर्गवारीतील ग्राहकांकडे वीज देयकांचे ६६ कोटी रुपये थकले आहेत.

72,000 customers have not paid a single bill since November | नोव्हेंबरपासून तब्बल ७२ हजार ग्राहकांनी भरले नाही एकही वीज बिल

नोव्हेंबरपासून तब्बल ७२ हजार ग्राहकांनी भरले नाही एकही वीज बिल

Next

अकोला : वापर झालेल्या प्रत्येक युनिटचे पैसे महावितरणला मिळणे अपेक्षित असताना अकोला परिमंडलातील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील ७२ हजार वीज ग्राहकांनी नोव्हेंबर महिन्यापासून एकदाही वीज भरले नाही. या वर्गवारीतील ग्राहकांकडे वीज देयकांचे ६६ कोटी रुपये थकले आहेत.

कोरोनाकाळात लॉकडाऊनमुळे अनेकांची आर्थिक घडी विस्कटली आहे. ही परिस्थिती लक्षात घेता महावितरणने एप्रिल २०२० ते जानेवारी २०२१ या कालावधीत वीज ग्राहकांना वीजबिल वसुलीसाठी कोणताही तगादा न लावता अखंडित सेवा दिली. आता परिस्थिती सुधारत असताना वीजग्राहकांनी वापरलेल्या विजेचे बिल भरणे अपेक्षित आहे. यासाठी महावितरणकडून वसुली मोहीम सुरू करण्यात आली आहे. तथापि, वीज ग्राहकांकडून अजूनही अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने आता महावितरणचीच आर्थिक बाजू कमकुवत झाली आहे. वीज खरेदी, कंत्राटदारांची देणी, कर्जाचे हप्ते, आस्थापना खर्च, दैनंदिन देखभाल व दुरुस्ती खर्च भागवणे अशक्य होत आहे. परिणामी येत्या काही दिवसात या थकबाकीमुळे वीजपुरवठ्यावर परिणाम होण्याची व अडचणी येण्याची शक्यता आहे.

 

असे आहेत वीजबिल न भरणारे ग्राहक

जिल्हा        ग्राहक            थकबाकी

अकोला      २४,२३३         २४ कोटी २२ लाख

बुलडाणा    ३६,८४३          ३१ कोटी ६१ लाख

वाशिम      १०,८९७          १० कोटी २२ लाख

Web Title: 72,000 customers have not paid a single bill since November

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.