कोरोना उपाययोजनांसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून ७.२४ कोटी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:16 AM2021-05-30T04:16:49+5:302021-05-30T04:16:49+5:30

संतोष येलकर अकोला : जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी उपाययोजनांकरिता जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेतून २० मे पर्यंत ...

7.24 crore from district annual plan for corona measures! | कोरोना उपाययोजनांसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून ७.२४ कोटी !

कोरोना उपाययोजनांसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून ७.२४ कोटी !

Next

संतोष येलकर

अकोला : जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी उपाययोजनांकरिता जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेतून २० मे पर्यंत ७ कोटी २४ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात आला. ऑक्सिजन प्लांट, जम्बो कोविड रुग्णालय आणि औषध सामग्रीसाठी संंबंधित यंत्रणांना निधी वितरित करण्यात आला.

जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असून, कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. २०२१-२०२२ या आर्थिक वर्षात जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेंतर्गत जिल्ह्यातील विविध विकासकामांसाठी १८५ कोटी रुपयांचा निधी मंजूर असून, शासनाच्या निर्देशानुसार जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेंतर्गत मंजूर निधीपैकी ३० टक्के निधी कोरोना उपाययोजनांकरिता वर्षभरात खर्च करावयाचा आहे. त्यानुसार जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा संसर्ग नियंत्रित करण्यासाठी जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेंतर्गत मंजूर १८५ कोटी रुपयांच्या निधीतून ५५ कोटी ५० लाख रुपयांचा निधी वर्षभराच्या कालावधीत कोरोना उपाययोजनांच्या कामांकरिता उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यापैकी २० मे पर्यंत जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेंतर्गत ७ कोटी २४ लाख रुपयांचा निधी कोरोना उपाययोजनांसाठी संबंधित यंत्रणांना वितरित करण्यात आला आहे.

‘या’ उपाययोजनांसाठी वितरित

करण्यात आला निधी!

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ऑक्सिजन प्लांट, डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ परिसरात दीक्षांत सभागृहातील जम्बो कोविड रुग्णालय, जिल्ह्यातील तालुकास्तरावरील कोविड सेंटर आणि आवश्यक औषध सामग्री इत्यादी उपाययोजनांसाठी जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेतून ७ कोटी २४ लाख रुपयांचा निधी संबंधित यंत्रणांना उपलब्ध करून देण्यात आला आहे.

जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेंतर्गत एकूण मंजूर निधीपैकी ३० टक्के निधी जिल्ह्यातील कोरोना विषाणू संसर्ग नियंत्रणाच्या उपाययोजनांसाठी खर्च करणे अपेक्षित आहे. त्यानुसार जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत एकूण मंजूर निधीपैकी ५५ कोटी ५० लाख रुपयांचा निधी वर्षभराच्या कालावधीत कोरोना उपाययोजनांसाठी वितरित करण्यात येणार आहे. त्यापैकी ७ कोटी २४ लाख रुपयांचा निधी २० मे पर्यंत संबंधित यंत्रणांना उपलब्ध करून देण्यात आला आहे.

गिरीश शास्त्री

जिल्हा नियोजन अधिकारी, अकोला

Web Title: 7.24 crore from district annual plan for corona measures!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.