अकोला जिल्ह्यात ७३ हजार शेतकऱ्यांनाही मिळू शकते सहा हजारांची मदत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2019 02:25 PM2019-02-13T14:25:28+5:302019-02-13T14:25:40+5:30
अकोला: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत दोन हेक्टरपर्यंत शेतजमीन असलेल्या अल्प व अत्यल्प भूधारक शेतकºयांच्या बँक खात्यात दरवर्षी सहा हजार रुपयांची मदत जमा करण्यात येणार आहे.
- संतोष येलकर
अकोला: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत दोन हेक्टरपर्यंत शेतजमीन असलेल्या अल्प व अत्यल्प भूधारक शेतकºयांच्या बँक खात्यात दरवर्षी सहा हजार रुपयांची मदत जमा करण्यात येणार आहे; मात्र या योजनेंतर्गत असलेली दोन हेक्टरची मर्यादा वाढविण्याचा किंवा काढण्याचा विचार राज्य सरकार करीत आहे. त्यानुषंगाने दोन हेक्टरची मर्यादा काढून टाकल्यास जिल्ह्यात दोन हेक्टरपेक्षा (पाच एकरपेक्षा) जास्त जमीन असलेल्या ७३ हजार ४०० शेतकºयांनाही या योजनेंतर्गत दरवर्षी सहा हजार रुपयांची मदत मिळण्याची शक्यता आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत दोन हेक्टरपर्यंत (पाच एकरपर्यंत ) जमीन असलेल्या अल्प व अत्यल्प भूधारक प्रत्येक शेतकरी कुटुंबाला दरवर्षी सहा हजार रुपयांची आर्थिक मदत तीन टप्प्यांत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्या असून, त्यानुसार योजनेची अंमलबजावणी सुरू करण्यात आली असून, जिल्ह्यातील अल्प व अत्यल्प भूधारक शेतकºयांच्या याद्या तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. जिल्ह्यात दोन हेक्टरपर्यंत शेतजमीन असलेल्या २ लाख ४३ हजार ९५० अल्प व अत्यल्प भूधारक शेतकºयांना या योजनेचा लाभ होणार आहे. दरम्यान, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत दरवर्षी सहा हजार रुपयांची मदत देण्यासाठी असलेली दोन हेक्टरची मर्यादा वाढविण्याचा किंवा काढून टाकण्याचा विचार राज्य सरकारकडून सुरू करण्यात आला आहे. या मदतीसाठी दोन हेक्टर शेतजमिनीची मर्यादा वाढविल्यास किंवा काढून टाकल्यास जिल्ह्यात दोन हेक्टरपेक्षा अधिक शेतजमीन असलेल्या ७३ हजार ४०० शेतकºयांनाही दरवर्षी सहा हजार रुपयांची मदत मिळण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात दोन हेक्टरपेक्षा जास्त जमीनधारक असे आहेत शेतकरी!
तालुका शेतकरी
अकोला २००२५
बाळापूर ९३४७
पातूर ७०६६
मूर्तिजापूर १४२२८
बार्शीटाकळी ६९७७
अकोट ९४४५
तेल्हारा ६३१२
.................................................
एकूण ७३४००