२३ ग्रामपंचायतींमधील २२१ सदस्यांसाठी पातुर तालुक्यात ७३९ नामांकने दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:19 AM2020-12-31T04:19:56+5:302020-12-31T04:19:56+5:30
तालुक्यातील शिर्ला मलकापूर, तांदळी बुद्रूक, पिंपळखुटा, राहेर, उमरा, विवरा, चतारी, चांगेफळ, चांन्नी सायवनी, मळसुर, भंडारज बुद्रूक, दिग्रस बुद्रूक, आलेगाव ...
तालुक्यातील शिर्ला मलकापूर, तांदळी बुद्रूक, पिंपळखुटा, राहेर, उमरा, विवरा, चतारी, चांगेफळ, चांन्नी सायवनी, मळसुर, भंडारज बुद्रूक, दिग्रस बुद्रूक, आलेगाव चरणगाव, पास्टूल, खानापूर बेलुरा बुद्रूक, बेलुरा खुर्द, दिग्रस खुर्द, सस्ती, देऊळगाव येथील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होत आहे.
पातुर तालुक्यातील २३ ग्रामपंचायतींच्या ८१ वॉर्डांतील २२१ जागांसाठी अखेरच्या दिवसापर्यंत ७३९ नामांकने दाखल झाली आहेत.
प्रामुख्याने तालुक्यातील सर्वांत मोठ्या लक्षवेधी ग्रामपंचायतीमध्ये शिर्ला सहा वॉर्डांतील १७ जागांसाठी ९५ अर्ज, आलेगाव सहा वॉर्डांतील १७ जागांसाठी ८९ अर्ज, पिंपळखुटा चार वॉर्डांतील ११ जागांसाठी ४० अर्ज, विवरा येथील चार वॉर्डांतील ११ जागांसाठी ४६ अर्ज, मलकापूर तीन वॉर्डांतील सात जागांसाठी १९ अर्ज, राहेर येथील तीन वॉर्डांतील नऊ जागांसाठी २१ अर्ज, उमरा येथील चार वॉर्डांतील ११ जागांसाठी २७ अर्ज, चतारी येथील तीन वॉर्डांतील नऊ जागांसाठी ३४ अर्ज, चांगेफळ येथील तीन वॉर्डांतील नऊ जागांसाठी ३७ अर्ज, चांन्नीच्या तीन वॉर्डांतील नऊ जागांसाठी ३४ अर्ज, सायवनीच्या तीन वॉर्डांतील सात जागांसाठी १४ अर्ज, मळसुर चार वॉर्डांतील ११ जागांसाठी ३३ अर्ज, भंडाराज बुद्रूकच्या तीन वॉर्डांतील सात जागांसाठी १८ अर्ज, दिग्रस बुद्रूकच्या तीन वॉर्डांतील नऊ जागांसाठी २८ अर्ज, चरणगावच्या तीन वॉर्डांतील नऊ जागांसाठी ३६ अर्ज, पास्टुलच्या तीन वॉर्डांतील सात जागांसाठी १३ अर्ज, खानापूरच्या तीन वॉर्डांतील नऊ जागांसाठी १३ अर्ज, बेलुरा बुद्रूकच्या तीन वॉर्डांतील सात जागांसाठी १७ अर्ज, बेलुरा खुर्दच्या तीन वॉर्डांतील सात जागांसाठी १३ अर्ज, दिग्रस खुर्दच्या तीन वॉर्डांतील सात जागांसाठी २२ अर्ज, सस्तीच्या पाच वॉर्डांतील १३ जागांसाठी ३२ अर्ज, देऊळगावच्या तीन वॉर्डांतील नऊ जागांसाठी ३० अर्ज या अनुषंगाने नामांकने दाखल करण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी गर्दी, गोंधळ आणि प्रचंड उत्साहात लोकांनी सादर केली.
प्रामुख्याने पातुर तालुक्यातील लक्षवेधी ग्रामपंचायत शिरला येथील एका पॅनलच्या १७ उमेदवारांनी वाजतगाजत तहसील कार्यालय गाठले आणि एकाच वेळेस १७ नामांकने दाखल केली.
नामांकनं दाखल करणाऱ्या २३ ग्रामपंचायतींतील ७३९ उमेदवारांपैकी बहुतांशी उमेदवार २० ते ४०च्या वयोगटातील असल्यामुळे या ग्रामपंचायतींची सत्ता तरुणांच्या हातात जाईल असं काहीसं चित्र नामांकन दाखल करण्याच्या कालावधीमध्ये बघायला मिळालं.