शेतकऱ्यांची व्यथा मांडण्यासाठी ७५ वर्षीय विमला आजी रस्त्यावर; राहुल गांधी यांनी स्वीकारला सत्कार!
By रवी दामोदर | Published: November 17, 2022 10:49 AM2022-11-17T10:49:53+5:302022-11-17T10:50:20+5:30
विदर्भात शेतकऱ्यांच्या समस्या हे नित्याच्याच आहेत. यंदा अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
अकोला
विदर्भात शेतकऱ्यांच्या समस्या हे नित्याच्याच आहेत. यंदा अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र अद्यापही शेतकऱ्यांना मदत तथा विमा मिळाला नाही. शेतकऱ्यांच्या व्यथा मांडण्यासाठी बाबुळगाव येथील विमल वसंत तिडके ह्या ७५ वर्षीय आजीबाई भारत जोडो यात्रेला समर्थन देण्यासाठी रस्त्यावर उतरल्या. राहुल गांधीनी ही भेट घेत त्यांचा सत्कार स्वीकारला.
भारत जोडो ७१ दिवशी अकोला जिल्ह्यातून वाटचाल करीत आहे. ही यात्रा पातुर तालुक्यातील बाभूळगाव येथे पोहोचली असता तिथे ७५ वर्षीय विमल वसंत तिडके ह्या आजी शेतकऱ्यांची व्यथा मांडण्यासाठी रस्त्यावर उभ्या होत्या. ही बाब राहुल गांधी यांच्या लक्षात येताच त्यांनी आजींची भेट घेत त्यांचा सत्कार स्वीकारला.
रात्रभर जागून तयार केला कापसाचा हार!
राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा ही गावातून जात असल्याने विमल वसंत तिडके या आजीने रात्रभर जागून कापसाचा हार बनविला सकाळी त्यांच्या स्वागतासाठी त्या रस्त्यावर होत्या राहुल गांधी यांनीही त्यांचा सत्कार स्वीकारला. यावेळी यशोदा खडसे, गीता तिडके, दिव्या तिडके, शारदा फटकर, मीना डीवरे, मंगला फटकर आदी महिला उपस्थित होत्या.