चारा पिकांसाठी ७६१ हेक्टर जमीन उपलब्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 01:25 PM2018-12-15T13:25:52+5:302018-12-15T13:26:10+5:30
अकोला : दुष्काळी परिस्थितीत शासनाच्या निर्णयाप्रमाणे जिल्ह्यातील धरण, जलाशय व तलावांच्या क्षेत्रातील जमिनीचा उपयोग चारा पिके घेण्यासाठी करण्यात येणार आहे.
अकोला : दुष्काळी परिस्थितीत शासनाच्या निर्णयाप्रमाणे जिल्ह्यातील धरण, जलाशय व तलावांच्या क्षेत्रातील जमिनीचा उपयोग चारा पिके घेण्यासाठी करण्यात येणार आहे. त्यानुसार चारा पिके लागवडीसाठी जिल्ह्यात धरण, जलाशयांच्या क्षेत्रात ७६१ जमीन उपलब्ध असून, चारा पिकांच्या लागवडीसाठी जिल्ह्यातील शेतकºयांनी पशुसंवर्धन विभागाकडे अर्ज करून, योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी केले आहे.
जिल्ह्यात चारा पिके घेण्यासाठी धरण, जलाशय व तलावांच्या क्षेत्रात ७६१ हेक्टर जमीन उपलब्ध आहे. त्यामध्ये ६०० हेक्टर पाटबंधारे विभाग, १०० हेक्टर जिल्हा परिषद आणि ६१ हेक्टर जमीन लघू पाटबंधारे विभागाची आहे. या जमिनीचा उपयोग चारा लागवडीसाठी करण्यात येणार आहे. त्यानुषंगाने चारा लागवडीसाठी १५ डिसेंबरपर्यंत जिल्ह्यातील शेतकºयांनी पशुसंवर्धन अधिकाºयांकडे अर्ज सादर करून, या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकाºयांनी केले आहे. यासंदर्भात १५ डिसेंबर रोजी जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात येणार असून, त्यामध्ये चारा लागवडीसाठी लाभार्थी शेतकºयांची नावे निश्चित करण्यात येणार असल्याचेही जिल्हा प्रशासनामार्फत कळविण्यात आले आहे.