७७ विद्यार्थ्यांची इन्स्पायर अवॉर्डसाठी निवड!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2019 12:05 PM2019-12-02T12:05:14+5:302019-12-02T12:05:29+5:30
विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाने इन्स्पायर अवार्डसाठी जिल्ह्यातील ७७ विद्यार्थ्यांची निवड केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: विज्ञान विषयात रुची निर्माण करण्यासाठी केंद्र शासनाकडून इन्स्पायर अवार्ड व विज्ञान प्रदर्शन राबविण्यात येते. यंदा देशभरातून विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय व नॅशनल इनोव्हेटिव्ह फाउंडेशनकडून शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत विज्ञान प्रतिकृती व विद्यार्थ्यांची माहिती मागविली होती. त्यानुसार विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाने इन्स्पायर अवार्डसाठी जिल्ह्यातील ७७ विद्यार्थ्यांची निवड केली आहे. या विद्यार्थ्यांना विज्ञान प्रतिकृती निर्मितीसाठी प्रत्येकी १0 हजार रुपयांची मदत करण्यात येणार आहे.
इन्स्पायर अवार्डसाठी देशभरातून १ लाख विद्यार्थ्यांची निवड करण्यात येते. त्यासाठी प्रत्येक शाळेतून विद्यार्थ्यांनी तयार केलेले विज्ञान प्रतिकृती व त्याची माहिती शिक्षणाधिकाऱ्यांच्या माध्यमातून विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय व नॅशनल इनोव्हेटिव्ह फाउंडेशन (एनटीएफ) पाठविण्यात येते. यंदाच्या विज्ञान प्रतिकृतीचा विषय हा दैनंदिन जीवन येणाºया समस्या व त्यावर उपाययोजना हा होता. या विषयावर विद्यार्थ्यांनी शालेय स्तरावरून माहिती सादर केली. त्यानुसार नॅशनल इनोव्हेटिव्ह फाउंडेशनने राज्यभरातून तब्बल ३ हजार ८४४ विद्यार्थ्यांची इन्स्पायर अवार्डसाठी निवड केली आहे. अकोला जिल्ह्यातून ७७ विद्यार्थ्यांची करण्यात आली आहे.
निवड करण्यात आलेले विद्यार्थी!
प्रणव संतोष वाकोडे, गणेश श्रावण मुरळ, अनिकेत विनोद खंडारे,मो. अली शेख अहमद, श्रृतिका राजेंद्र पाचडे, मेघश्याम गोपालकृष्ण सुकळीकर, रणवीर रामानंद फाटे, पीयूष जयकिशन दांडे, सुजल दत्तराव भाकरे, ईश्वर दिलीप आगळे, अभिशिखा गजानन भालतिलक, नेहा राजेश वाघमारे, गायत्री यदुराज महल्ले, सारंगी संतोष देशमुख, पूजा गजानन कडू, सचिन अविनाश नागपुरे, भूषण पंकज ठाकरे, अथर्व गजानन कोल्हे, निनाद नितीन कोंदे, निकुंज केशव उंबरकर, सायदा सारा जयपुरी, माधुरी संतोष पोधाडे, जुई नंदकिशोर आवारे, अमर विजय डोंगरे, अथर्व राजेंद्र ढवळे, प्रथमेश अनिल गुजर, सुमेध साहेबराव इंगळे, महेक रमेश भाटिया, अचल विलास, पूनम विजय तायडे, मरियम फातेमा, कजिम खान फिरोज खान, बिनीश सालेहा अ. नाजिम, सोहम तेजराव वरोकार, स्वरा राहुल पाटील, संचित हरेश चंदनानी, तन्मय मनीष बाजड, दीपा अजय पान्हनकर, रोहित भास्कर डोंगरे, संकेत प्रमोद रोहणकर, सुजल सुभाष कडू, शुभांगी संजय गावंडे, आरती राहुल लबडे, नासिम शाह राशिद शाह, शाहू श्रीकांत कराळे, जय सुनील भड, सोपान प्रमोद पिलत्तवार, रोहन नाजूकराव धांडे, अर्पित राजेश फेंडर, सिद्धी विजयसिंग खन्नाडे, अचल सुधाकर गणगणे, सय्यद जुनेद, अशरफ झिशान, काशिफउर रहेमान, खुशी सुधाकर वानखडे, गणेश प्रकाश माळी, साई साहील साई जलील, विठ्ठल ज्ञानेश्वर अकोटकर, विश्वदीप विकास सिरसाट, अभय रवी खाडे, ओम श्याम बावनेर, सार्थक कुचर, अमित इंगळे, अंकिता हरसुले, दानिश शाह, शीतल अनिल हले, तृप्ती शेंडे, रेश्मा शेंडे, अर्पिता दिलीप इंगळे, संजीवनी वानखडे, दीप गोरले, प्रथमेश पारवे, अमित पचारे, मो. सोहेल, स्नेहल घाटे, आयुष राहाटे यांचा समावेश आहे.