सहा वर्षात ७७ हजार कुष्ठरुग्णांवर उपचार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2016 02:10 AM2016-02-01T02:10:43+5:302016-02-01T02:10:43+5:30

कुष्ठरोग पंधरवड्यातंर्गत ३0 जानेवारी ते १३ फेब्रुवारी दरम्यान शोध मोहिम व उपचार.

77 thousand leprosy patients treated in six years! | सहा वर्षात ७७ हजार कुष्ठरुग्णांवर उपचार!

सहा वर्षात ७७ हजार कुष्ठरुग्णांवर उपचार!

Next

नीलेश शहाकार/बुलडाणा: राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमांतर्गत गत सहा वर्षांंत राज्य आरोग्य विभागाकडून ७७९४६ रुग्णांवर उपचार करण्यात आले. यावर्षी ३0 जानेवारी ते १३ फेब्रुवारीदरम्यान राज्यभरात कुष्ठरोग पंधरवडा राबविण्यात येत असून यादरम्यान रुग्ण शोधून त्यांच्यावर उपचार केले जाणार आहेत.
केंद्र शासनाकडून २0१७ पर्यंत बारा पंचवार्षिक योजनांमध्ये कुष्ठरोग दुरीकरण मोहीम आखण्यात आली आहे. दरवर्षी २ ऑक्टोबर आणि ३0 जानेवारी रोजी राज्यात विशेष कुष्ठरुग्ण शोध मोहीम राबविण्यात येते. या मोहिमेअंतर्गत ज्या तालुक्यांमध्ये नवीन कुष्ठरुग्णांचे प्रमाण एक लाख लोकसंख्येमागे दहा रुग्णांपेक्षा जास्त आहे, अशा तालुक्यांमध्ये विशेष लक्ष दिले जाते. या मोहिमेत आरोग्य विभाग, आशा वर्कर, सामाजिक न्याय विभाग, शिक्षण विभाग, राज्य वाहतूक विभाग, माहिती व प्रसिद्धी माध्यमे, प्रसार भारती, रेल्वे, एसटी महामंडळ आदी विभाग सहभागी होतात. संशयित कुष्ठरुग्ण शोधून त्यांच्यावर तातडीने औषधोपचार करण्यात येतात.

बुलडाणा जिल्ह्यात दोन तालुक्यात विशेष कुष्ठरोग अभियान
बुलडाणा जिल्ह्यातील आठ तालुक्यात कुष्ठरोगाचे क्रियाशिल रुग्ण जास्त आहे. गत वर्षी या तालुक्यांमध्ये २७५ कुष्ठरोगांचे रुग्ण शोधून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. नांदूरा व संग्रामपूर या दोन तालुक्यामध्ये कुष्ठरोग पंधरवड्यादरम्यान विशेष अभियान राबविण्यात येत आहे.

Web Title: 77 thousand leprosy patients treated in six years!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.