विदर्भातील ७८ हजार शेतकऱ्यांनी केला ६४ कोटींचा भरणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:18 AM2021-03-25T04:18:55+5:302021-03-25T04:18:55+5:30
महावितरणच्या महाकृषी ऊर्जा धोरणाला विदर्भातील महावितरणच्या अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया आणि चंद्रपूर या सर्व पाचही परिमंडलात चांगला प्रतिसाद मिळत ...
महावितरणच्या महाकृषी ऊर्जा धोरणाला विदर्भातील महावितरणच्या अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया आणि चंद्रपूर या सर्व पाचही परिमंडलात चांगला प्रतिसाद मिळत आहे. धोरणाच्या व्यापक प्रसारासाठी महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रभारी प्रादेशिक संचालक सुहास रंगारी यांच्या मार्गदर्शनाखाली अकोला परिमंडलाचे मुख्य अभियंता अनिल डोये, अमरावती परिमंडलाच्या मुख्य अभियंता सुचित्रा गुजर, नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके, गोंदिया परिमंडलाचे मुख्य अभियंता सुखदेव शेरकर, चंद्रपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनील देशपांडे यांच्यासह अभियंते, जनमित्र आणि सर्व तांत्रिक आणि अतांत्रिक अधिकारी-कर्मचारी परिश्रम घेत आहेत. ग्राहकांशी थेट संपर्क, ग्राहक मेळावे, विविध प्रसिद्धिमाध्यमांद्वारे मोठ्या प्रमाणात जनजागृती यामुळे या धोरणाला यश मिळत आहे. यासाठी महावितरणकडून संपूर्ण विदर्भात ३५८ ग्राहक मेळावे, २०६ ग्रामसभा, १७५ ठिकाणी ग्राहक संपर्क अभियान राबविण्यात आले.
कृषी ऊर्जा धोरणाचा २३ मार्च २०२१च्या अखेरीस विदर्भातील ७७ हजार ५६६ कृषी पंपधारक ग्राहकांनी लाभ घेतला असून या ग्राहकांनी थकीत वीज बिल आणि चालू महिन्याचे वीज बिल अशा दोन्ही बिलांपोटी सुमारे ६४ कोटी ३० लाख रुपयांचा भरणा केला आहे. या धोरणांनुसार शेतकऱ्यांकडून जमा झालेल्या रकमेपैकी ३३ टक्के रक्कम ही त्या गावातील विद्युत यंत्रणेच्या सक्षमीकरणासाठी खर्च करण्यात येणार असल्याने शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी होऊन गावच्या विकासात हातभार लावण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. या धोरणांनुसार शेतकऱ्यांकडून जमा झालेल्या रकमेपैकी ३३ टक्के रक्कम ही त्या गावातील विद्युत यंत्रणेच्या सक्षमीकरणासाठी खर्च करण्यात येणार असल्याने शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी होऊन गावच्या विकासात हातभार लावण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
असा आहे परिमंडळनिहाय तपशील
परिमंडळ शेतकरी केलेला भरणा
अकोला १३,०६२ ८.६७ कोटी
अमरावती ९,६४० १०.१८ कोटी
नागपूर २१,४१२ १८.९५ कोटी
चंद्रपूर २१,६६० १५.४१ कोटी
गोंदिया १२,७९२ ११.१० कोटी