तेल्हारा तालुक्यातील ३४ ग्रामपंचायत ३२२ सदस्यांसाठी ७८५ उमेदवारी अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:19 AM2020-12-31T04:19:58+5:302020-12-31T04:19:58+5:30

तेल्हारा *खेलसटवाजी ग्रामपंचायत अविरोध तर सहा ग्रामपंचायत अविरोधच्या वाटेवर तेल्हारा तालुक्यातील ३४ ग्रामपंचायतीं च्या ३२२ ग्रामपंचायत ...

785 candidature applications for 322 members of 34 Gram Panchayats in Telhara taluka | तेल्हारा तालुक्यातील ३४ ग्रामपंचायत ३२२ सदस्यांसाठी ७८५ उमेदवारी अर्ज

तेल्हारा तालुक्यातील ३४ ग्रामपंचायत ३२२ सदस्यांसाठी ७८५ उमेदवारी अर्ज

Next

तेल्हारा

*खेलसटवाजी ग्रामपंचायत अविरोध तर सहा ग्रामपंचायत अविरोधच्या वाटेवर

तेल्हारा तालुक्यातील ३४ ग्रामपंचायतीं च्या ३२२ ग्रामपंचायत सदस्यांसाठी शेवटच्या दिवशी तब्बल ३४४ उमेदवारी अर्ज आल्याने तहसील कार्यालयाला आज यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले असल्याचे दिसून आले

तालुक्यातील हिवरखेड, कार्ला, सौन्दला,गोर्धा, हिंगणी, दानापूर,खंडाळा, अडगाव, शिवाजी नगर,शीरसोली अटकली, चांगलवाडी, रायखेड,बेलखेड, वरुड बु.,घोडेगाव, रानेगाव, जस्तगाव,भांबेरी,थार, तुदगाव, वाकोडी,इसापूर, वाडी अडमपूर,वडगाव रोठे,मनब्दा,तळेगाव वडणेर, खेळदेशपांडे,वांगरगाव, अडसूळ,खेल सटवाजी,नर्सिपुर, नेर,पिवंदळ या ग्रामपंचायतीचे सदस्य १२० प्रभाग असून ३२२ सदस्यांसाठी अनेक उमेदवारांनी शेवटच्या दिवशी एकच गर्दी केली असून एकूण ७८५ उमेदवारी अर्ज शेवटच्या दिवशीपर्यंत दाखल झाले. खेल सटवाजी ही ग्रामपंचायत अविरोध झाली असून चांगलवाडी,गोर्धा,जस्तगाव,रानेगाव, वडगांव रोठे,वरुड बु या ग्रामपंचायती अविरोध होण्याच्या मार्गावर आहेत, अशी माहिती तहसीलदार राजेश गुरव यांनी दिली. शेवटच्या अनेकांची धांदल उडाली. अनेकांच्या त्रूटी पूर्ण करण्यासाठी अनेक जण चकरा मारीत कुठल्याही परिस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल झाला पाहिजे यासाठी प्रयत्नशील होते तर अनेक जण आपण अविरोध येण्यासाठी आपल्या समोर विरुद्ध दिशेने उमेदवारी अर्ज यायला नको यासाठी प्रयत्नशील होते तर काही जणांचे काहीही प्रयत्न न करता अविरोध निवडून आल्याने अनेक जण आनंद साजरा करीत असल्याचे दिसून आले. निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार राजेश गुरव यांनी कोरोनाच्या धर्तीवर तगडा पोलीस बंदोबस्त लावून मास्कचा वापर असल्याशिवाय व विना कामानिमित्त आत येणाऱ्याची गोची केली होती. पोलीस निरीक्षक दिनेश शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली तगडा पोलीस बंदोबस्त लावला होता.

Web Title: 785 candidature applications for 322 members of 34 Gram Panchayats in Telhara taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.