फायनान्स कंपनीची ७९ लाखांनी फसवणूक!
By admin | Published: July 3, 2017 02:08 AM2017-07-03T02:08:32+5:302017-07-03T02:08:32+5:30
२० जणांविरुद्ध गुन्हा दाखल: तीन जिल्ह्यांतील वाहन मालक
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : फायनान्स कंपनीकडून वाहन खरेदीसाठी कर्ज घेतले; परंतु कर्ज न भरल्यामुळे फायनान्स कंपनीने रविवारी दुपारी २० वाहन मालकांविरुद्ध ७९ लाख ८ हजार ५३० रुपयांनी फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली. सिव्हिल लाइन पोलिसांनी २० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
जवाहर नगरातील एक्वीटास फायनान्स कंपनीचे व्यवस्थापक धर्मेंद्र सिरसाट यांच्या तक्रारीनुसार, एक्वीटास फायनान्स कंपनी ही नवीन व जुन्या वाहनांच्या खरेदीसाठी कर्ज उपलब्ध करून देते. २०१२ ते २०१५ या कालावधीत २० जणांनी जुने वाहन खरेदी करण्यासाठी कंपनीकडून कर्ज घेतले; परंतु विहित मुदतीमध्ये कर्जाची परतफेड केली नाही आणि कंपनीच्या कर्जावर घेतलेल्या वाहनांची परस्पर विक्री करून कंपनीची ७९ लाख रुपयांनी फसवणूक केली. व्यवस्थापक धर्मेंद्र सिरसाट यांच्या तक्रारीनुसार सिव्हिल लाइन पोलिसांनी भादंवि कलम ४२० (३४) नुसार गुन्हा दाखल केला. यापूर्वीही अनेकांनी एक्वीटास फायनान्स कंपनीकडून लाखो रुपयांचे कर्ज घेऊन वाहन खरेदी केली; परंतु कंपनीचे कर्ज भरले नाही. अशा अनेक कर्जदारांविरुद्ध कंपनीने पोलिसांत तक्रारी दिल्या आहेत. आरोपींवर अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई झाली नाही. फायनान्स कंपनीने पुन्हा २० जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. त्यामुळे आता या २० लोकांविरुद्ध पोलीस काय कारवाई करतात, याकडे लक्ष लागले आहे.
कोणी, किती रुपयांनी केली फसवणूक
- दर्यापूर तालुक्यातील बाभळी येथील अ. जलील शेख बुरहान याने जुना ट्रक घेण्यासाठी चार लाख कर्ज घेतले. कारंजा लाड येथील काजी प्लॉटमधील मो.वईस अ. रशीद याने ५.८५ लाख रुपये कर्ज घेतले.
- अमरावती येथील गुलिस्थान नगरातील शेख इमरान शेख सलीम याने ४ लाख १0 हजार, अकोल्यातील अकबर प्लॉटमधील शेख इमरान शेख रहमान याने २ लाख १0 हजार रुपये, पातूर येथील कसाईपुऱ्यात राहणारा रफिक खान रशीद खान याने ५ लाख ६८ हजार रुपये.
- अकोल्यातील ताज नगरात राहणारा एजाज खान युसूफ खान याने ३.५० लाख, नाजूक नगरातील अमीन खान मान खान याने पाच लाख रुपये, अचलपूर तालुक्यातील पथ्रोट येथील वाजिद शाह बिस्मिल्लाह शाह याने १.३० लाख रुपये, मोहम्मद अली रोडवरील तारिक अख्तर रशीद खान याने ५.८५ लाख रुपये, अमरावती येथील रतनगंज येथील मो.वाजिद मो.जावेद याने ४.५० लाख, अकोल्यातील अनंत नगरात राहणारा अब्दुल शकील अब्दुल हकीम याने १.२० लाख रुपये.
- मूर्तिजापुरातील पठाणपुऱ्यात राहणारा इरशाद खान याने ५.८५ लाख, अकोट फैलातील शे.वसीम शेख नदीम याने १.४० लाख, अमरावतीतील रहमत नगरात राहणारा अयुब खान गुड्डे खान याने एक लाख, जमील कॉलनी येथील वसीम खान रशीद खान याने ३.५० लाख.
- अकोल्यातील लाल बंगला येथील दाऊद खान कादर खान याने ५.९० लाख, सतरंजीपुऱ्यातील श्यामलाल दगडुराम अहिर याने दोन लाख रुपये, अमरावतीतील काँग्रेस नगरात राहणारा आसिफ खान सुलतान खान याने ५.५० लाख, कारंजा लाड येथील अ.रशीद अ.सत्तार याने ५.२५ लाख रुपयांचे कर्ज घेतले.