७,९०२ शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांचे प्रमाणीकरण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2020 11:37 AM2020-03-02T11:37:28+5:302020-03-02T11:37:53+5:30
१ मार्चपर्यंत जिल्ह्यातील सातही तालुक्यात ७ हजार ९०२ शेतकºयांच्या कर्जखात्यांचे प्रमाणीकरण करण्यात आले आहे.
अकोला : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यात कर्जमुक्तीसाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांपैकी २९ फेबु्रवारीपर्यंत ८६ हजार ६२३ शेतकºयांच्या गावनिहाय याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या असून, याद्यानुसार शेतकºयांच्या कर्जखात्यांचे प्रमाणीकरण करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. रविवार, १ मार्चपर्यंत जिल्ह्यातील सातही तालुक्यात ७ हजार ९०२ शेतकºयांच्या कर्जखात्यांचे प्रमाणीकरण करण्यात आले आहे.
शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यात १ लाख १२ हजार ३७९ शेतकरी कर्जमुक्तीसाठी पात्र ठरले असून, त्यापैकी बँक खाते क्रमांक आधार क्रमांकाशी संलग्नित (लिंक) करण्यात आलेल्या १ लाख ११ हजार ७९ शेतकºयांच्या याद्या शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आल्या आहेत. कर्जमुक्तीसाठी पात्र शेतकºयांपैकी गावनिहाय याद्या प्रसिद्ध करण्याच्या पहिल्या व दुसºया टप्प्यात २९ फेबु्रवारीपर्यंत जिल्ह्यातील ८५३ गावांमध्ये ८६ हजार ६२३ शेतकºयांच्या गावनिहाय याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. प्रसिद्ध करण्यात आलेल्या शेतकºयांच्या याद्यानुसार गावपातळीवरच शेतकºयांच्या कर्जखात्यांचे प्रमाणीकरण करण्याचे काम प्रशासनामार्फत सुरू करण्यात आले आहे. त्यामध्ये शेतकºयांचे बँक खाते क्रमांक, आधार क्रमांक व कर्जखात्यातील रक्कम इत्यादींचे प्रमाणीकरण करण्यात येत आहे. प्रसिद्ध करण्यात आलेल्या याद्यानुसार ८६ हजार ६२३ शेतकºयांपैकी १ मार्चपर्यंत जिल्ह्यातील ७ हजार ९०२ शेतकºयांच्या कर्जखात्यांचे प्रमाणीकरण करण्यात आले आहे.