आठ शेतक-यांच्या आत्महत्या; मदत फक्त दोन कुटुंबांना !
By admin | Published: July 19, 2016 01:58 AM2016-07-19T01:58:01+5:302016-07-19T01:58:01+5:30
पाच आत्महत्या अपात्र ठरविल्या असून एका प्रकरणाची नव्याने चौकशी करण्याचे आदेश.
अकोला: गेल्या महिन्यात विविध कारणांमुळे आठ शेतकर्यांनी आत्महत्या केल्या असून या शेतकर्यांच्या कुटुंबीयांना देण्यात येणार्या मदतीच्या प्रकरणांवर सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. या बैठकीमध्ये दोन शेतकरी आत्महत्या या मदतीस पात्र ठरल्याने त्यांच्या कुटुंबीयांना मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तर पाच आत्महत्या अपात्र ठरविल्या असून एका प्रकरणाची नव्याने चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या बैठकीला जिल्हाधिकारी जी. ङ्म्रीकांत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, डॉ. प्रमोद चोरे, शिवाजीराव पवार उपस्थित होते. या बैठकीमध्ये आत्महत्या प्रकरणांमध्ये आकोट तालुक्यातील अंबोडा गावाचे रामकृष्ण नारायण अस्वार तसेच तेल्हारा तालुक्यातील थार येथील रघुनाथ सदाशिव फोकमारे या शेतकर्यांच्या कुटुंबीयांना मदत देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.