अकोला जिल्ह्यात बीटी कपाशीचे ८ लाख पाकीट आले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2020 04:52 PM2020-05-10T16:52:56+5:302020-05-10T16:53:04+5:30
कापूस बियाण्यांचा तुटवडा यावर्षी जाणवणार नाही असा दावा कृषी विभागामार्फत केला जात आहे .
अकोला: जिल्ह्यात यावर्षी एक लाख साठ हजार हेक्टर वर कापसाचे नियोजन करण्यात आले असून, यामध्ये ७० टक्के कोरडवाहू तर 30 टक्के ओलीताचे क्षेत्र आहे .यासाठी आठ लाख बीटी कपाशीचे पाकिटे उपलब्ध झाली आहे .त्यामुळे कापूस बियाण्यांचा तुटवडा यावर्षी जाणवणार नाही असा दावा कृषी विभागामार्फत केला जात आहे.
जिल्ह्यात जवळपास ६४० कृषी निविष्ठा विक्रेते आहेत ,योग्य दराने बियाणे मिळावे यासाठी शेतकऱ्यांनी या अधिकृत तविक्रेत्याकडून बियाणे घेणे गरजेचे आहे.यावर्षी बीजी-1 कापसाचे दर ६३५ रुपये बीजी-2 या कापसाच्या पाकिटाचे दर ७३० रुपये आहेत .हे बियाणे परवानाधारक विक्रेत्याकडून उपलब्ध होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करताना काळजी घेण्याची गरज आहे . बीजी-3 हे बियाणे अधिकृत नसल्याने शेतकºयांनी याबाबत दक्षता घेणे गरजेचे आहे .यावर्षी एक मे नंतर कपाशी बियाण्याचे पाकीट विकण्याची परवानगी देण्यात आली होती परंतु यामध्ये आता बदल करण्यात आला असून 15 मे रोजी कपाशी बियाण्याची पाकिटे वितरकांकडे पोहोचले जातील त्यानंतर 30 मे रोजी पर्यंत कपाशीचे बियाणे शेतकºयांना उपलब्ध होईल .शेंद्री अळीचा ळीच्या प्रकोप पाहता .मागील वर्षी प्रमाणे यावर्षी देखील हा निर्णय घेण्यात आला आहे .गुलाबी बोंड अळीने कपाशी पिकाचे प्रचंड नुकसान झालेले आहे मागच्या वर्षी यावर नियंत्रण मिळवण्यात कृषी विभाग,कृषी विद्यापीठाला यश आले आहे परंतु गुलाबी बोंड अळीचा धोका टळलेला नाही .यावर्षी खबरदारीचा उपाय म्हणून मे महिन्याच्या अखेरीस किंवा १ जूनपासून बीटी कपाशीची विक्री सुरू होईल.अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मोहन वाघ यांनी दिली.
दरम्यान, शेंदरी अळीचा प्रकोप टाळण्यासाठी शेतकºयांनी पूर्व हंगामी कपाशीची पेरणी करू नये असे आवाहनही त्यांनी केले आहे.
पेरणी जूनच्या दुसºया आठवड्यात?
.एका खासगी हवामान शास्त्र संस्थेने मान्सून ११ जून पर्यँत आगमन होण्याची शक्यतावर्तविली आहे म्हणजेच विदर्भात १५ ते २० जून नंतर पाऊस येण्याची शक्यता आहे .त्यामुळे यावर्षी पेरणी जून महिन्याच्या पंधरवड्यात होईल असे चित्र आहे.मिरुग नक्षत्र जर वेळेवर सुरू झाले आणि १०० मिमी पाऊस पडला तर पेरणी वेळेवर सुरू होईल.6