चालू महिन्यात तुरीला मिळणार ८ हजार प्रति क्विंटल भाव!
By admin | Published: December 5, 2015 09:09 AM2015-12-05T09:09:01+5:302015-12-05T09:09:01+5:30
कृषी अर्थशास्त्र सांख्यिकी व केंद्रीय विपणन केंद्राचा अंदाज.
अकोला: राज्यात तूर कडधान्य पिकाला चालू डिसेंबर महिन्यात सरासरी ७,५00 ते ८000 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळणार असल्याचा अंदाज डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कृषी अर्थशास्त्र, सांख्यिकी व केंद्रीय कृषी विपणन माहिती केंद्राने वर्तविला आहे. भारतात तुरीचे क्षेत्र दोन दशकात ३.५ ते ४ लाख हेक्टर असून, उत्पादन २.५ ते ३ लाख टन कमी अधिक स् िथर आहे. भारतीय कृषी संचालनालयानुसार २0१४-१५ मध्ये २.७८ लाख टन होते. इतर कडधान्य पिकाप्रमाणे तूर कोरडवाहू पीक म्हणून घेतले जाते. तुरीखालील ९६ टक्के क्षेत्र हे असिंचित आहे. तुरीखालील क्षेत्राच्या बाबतीत महाराष्ट्र देशात प्रथम क्रमाकांवर आहे. २0१३-१४ मध्ये १.१४ ला हेक्टर होते. उत्पादन १.0३ लाख टन झाले. महाराष्ट्रात लातूर, जळगाव, औरंगाबाद, मुंबई, अकोला व नागपूर हे महाराष्ट्रातील तुरीचे प्रमुख व्यापारी केंद्रे आहेत. तुरीचे उत्पन्न व किमतीचा कल या सर्व गोष्टींचा विचार करू न डॉ.पंदेकृविच्या कृषी अर्थशास्त्र व सां िख्यकी विभाग व अकोला येथील एन.ए.आय.पी. कृषी विपणन माहिती केंद्राच्या संशोधन चमूने लातूर बाजार पेठेतील मागील १६ वर्षांंच्या कालावधीतील तुरीच्या किमतीचे मासिक सरासरी पृथ्थकरण केले आहे. या अभ्यासाच्या निष्कर्षानुसार बाजारात चालू स्थिती कायम राहिल्यास, समतोल हवामानात तुरीला डिसेंबर २0१५ या चालू महिन्यात सरासरीच्या किमती जवळपास ७,५00 ते ८000 रुपये प्रतिक्विंटल राहण्याची श क्यता आहे. आयात-निर्यात धोरणात झालेले बदल तसेच सद्यस्थितीत हवामानात होणार्या बदलाचा परिणाम तुरीच्या किमतीवर होऊ शकतो.