पशुसंवर्धनच्या योजनांसाठी हवेत ८० लाख!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:14 AM2021-06-03T04:14:40+5:302021-06-03T04:14:40+5:30
अकोला: जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाच्या योजनांतर्गत गतवर्षी निवड करण्यात आलेल्या लाभार्थींना योजनांचा लाभ देण्यासाठी निधी उपलब्ध नसल्याने, पशुसंवर्धन विभागाच्या ...
अकोला: जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाच्या योजनांतर्गत गतवर्षी निवड करण्यात आलेल्या लाभार्थींना योजनांचा लाभ देण्यासाठी निधी उपलब्ध नसल्याने, पशुसंवर्धन विभागाच्या योजनांसाठी ८० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याच्या मागणीचा ठराव बुधवारी जिल्हा परिषद पशुसंवर्धन समितीच्या सभेत मंजूर करण्यात आला.
जिल्हा पशुसंवर्धन विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांतर्गत मागील वर्षी निवड करण्यात आलेल्या लाभार्थींना योजनेचा लाभ देण्यासाठी निधी उपलब्ध नसल्याने, निवड करण्यात आलेल्या लाभार्थींना योजनांचा लाभ देण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे आवश्यक असलेला ८० लाख रुपयांचा निधी पशुसंवर्धन विभागाला उपलब्ध करून देण्याच्या मागणीचा ठराव या सभेत मंजूर करण्यात आला. कोरोना काळात जिल्ह्यातील ग्रामीण भागात काम करणाऱ्या पशुसंवर्धन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना शासनाकडून ५० लाख रुपयांचे विमा कवच लागू करण्यात यावे अशा मागणीचा ठरावदेखील सभेत मंजूर करण्यात आला असून, हा ठराव शासनाकडे मान्यतेसाठी पाठविण्याचे सभेत ठरविण्यात आले. जिल्हा परिषद पशुसंवर्धन सभापती पंजाबराव वडाळ यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आलेल्या या सभेत समितीचे सदस्य व संबंधित अधिकारी सहभागी झाले होते.