पातुरात तुरीची आवक ८०० क्विंटल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:17 AM2021-01-18T04:17:14+5:302021-01-18T04:17:14+5:30
--------------------------------- पातुरातील रस्ते खड्डेमय! पातूर : शहरातील अंतर्गत रस्ते खड्डेमय झाले असून, याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे. खड्ड्यांमुळे ...
---------------------------------
पातुरातील रस्ते खड्डेमय!
पातूर : शहरातील अंतर्गत रस्ते खड्डेमय झाले असून, याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे. खड्ड्यांमुळे अपघातांच्या घटनांत वाढ झाली आहे. रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी वाहनधारकांकडून होत आहे.
--------------------------
चिखलगाव परिसरात भुईमूग पेरणीला सुरुवात
चिखलगाव: परिसरात भूईमुगाची पेरणी सुरू झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांना अनुदानावर मिळणाऱ्या बियाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे पेरणीला उशीर होत असल्याने शेतकरी चिंतेत सापडले आहेत. -----------------
तुरीच्या सोंगणीची लगबग
नया अंदुरा: परिसरातील कारंजा रमजानपूर, अंदुरा, हाता, बहादुरा कवठा, लोहारा, निंबी, शिंगोली, निंबा फाटा या परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी तुरीची सोंगणीची लगबग सुरू केली आहे.
--------------------
वन्यप्राण्यांचा हैदोस ; शेतकरी चिंतेत!
बोरगाव मंजू : वन्यप्राण्यांचा हैदोस वाढल्यामुळे शेतकरी चिंतेत सापडले आहेत. रात्रीच्या सुमारास रानडुकरे हरभऱ्याच्या शेतात शिरून पिकांचे नुकसान करीत असल्याचे चित्र आहे.