८१ वाहनांचा वापर खासगी कामांसाठी की अकोलेकरांसाठी?

By admin | Published: April 30, 2016 01:42 AM2016-04-30T01:42:43+5:302016-04-30T01:42:43+5:30

कचरा उचलण्यासाठी ८१ नवीन वाहनांची खरेदी.

81 for private use or for private use of vehicles? | ८१ वाहनांचा वापर खासगी कामांसाठी की अकोलेकरांसाठी?

८१ वाहनांचा वापर खासगी कामांसाठी की अकोलेकरांसाठी?

Next

आशीष गावंडे / अकोला
शहरातील साफसफाईची समस्या निकाली काढण्यासाठी मनपाने कचरा उचलण्यासाठी ८१ नवीन वाहनांची खरेदी केली. घरोघरी जाऊन कचरा जमा करण्यासाठी स्वयंरोजगार तत्त्वावर कर्मचारी नियुक्त केले. नागरिकही मनपाच्या उपक्रमाला साथ देत आहेत. रात्री दहानंतरही मनपाचे ह्यस्वच्छता दूतह्ण कचर्‍याची वाहतूक करताना आढळून येत असताना कचर्‍याची समस्या कायम कशी? अर्थात, या वाहनांचा वापर नेमक्या कोणत्या कामांसाठी सुरू आहे, असा प्रश्न उपस्थित होतो.
नागरिकांनी घरातील, दुकानांमधील कचरा सर्व्हिस लाइनमध्ये किंवा रस्त्यावर न फेकता मनपाच्या वाहनात जमा केल्यास सार्वजनिक ठिकाणी साचणार्‍या कचर्‍याची समस्या राहणार नाही, या उद्देशातून महापालिका प्रशासनाने ८१ नवीन वाहनांची खरेदी केली. मनपा आस्थापनेवरील ७४0 सफाई कर्मचार्‍यांमधून या वाहनांसाठी चालकांची नियुक्ती केल्यास प्रशासकीय प्रभागात साफसफाईची समस्या प्रभावित होईल, हा विचार करून मनपा आयुक्त अजय लहाने यांनी स्वयंरोजगार तत्त्वावर चालकांची नियुक्ती केली. मोटारवाहन विभागाकडून वाहनांसाठी दररोज ६ ते १0 लीटर डिझेल दिले जाते. ७३ प्रभागांमध्ये प्रत्येकी दोन वाहने देण्यात आले असून त्यांना ह्यस्वच्छता दूतह्णम्हणून ओळखल्या जाते. घरोघरी जाऊन कचरा जमा करण्याच्या बदल्यात ३0 रुपये आणि दुकानदार, हॉटेल व्यावसायिकांना ५0 रुपये महिन्याची शुल्क आकारणी करण्यात आली.
सकाळी ९ वाजता प्रभागातून कचरा जमा करण्याला सुरुवात झाल्यानंतर २00 ते ३00 घरातील कचरा जमा करण्यासाठी ह्यस्वच्छता दूतह्णला किमान ३ तासांचा अवधी लागतो. मोटारवाहन विभागाच्या दाव्यानुसार काही स्वच्छता दूत दिवसातून तीन ते चार वेळ तर कधी सात-आठ वेळ डम्पिंग ग्राऊंडवर कचरा नेऊन टाकतात. या विभागाचा दावा लक्षात घेता, सायंकाळी ६ पर्यंत कचर्‍याची वाहतूक होणे अपेक्षित असताना दुपारी अडीचपर्यंत बहुतांश वाहने मोटारवाहन विभागाच्या आवारात जमा असतात. काही वाहने अपवाद असून चक्क रात्री १0 पर्यंत कचर्‍याची वाहतूक करताना आढळून येत असल्याने ही प्रशासनाच्या डोळ्य़ात धूळ फेक असल्याचे दिसून येते.

Web Title: 81 for private use or for private use of vehicles?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.