कर्जमाफी : दोन गावांत पात्र ८१० शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2020 02:09 PM2020-02-25T14:09:58+5:302020-02-25T14:10:04+5:30
कर्जमाफीसाठी पात्र ८१० शेतकºयांच्या गावनिहाय याद्या सोमवारी प्रसिद्ध करण्यात आल्या.
अकोला : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेत कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या जिल्ह्यातील शेतकºयांपैकी पहिल्या टप्प्यात अकोला तालुक्यातील गोरेगाव व बाळापूर तालुक्यातील देगाव या दोन गावांत कर्जमाफीसाठी पात्र ८१० शेतकºयांच्या गावनिहाय याद्या सोमवारी प्रसिद्ध करण्यात आल्या. याद्यानुसार पात्र शेतकºयांचे बँक खाते क्रमांक, आधार क्रमांक व कर्जखात्यातील रकमेची पडताळणी करण्याचे काम प्रशासनामार्फत सुरू करण्यात आले.
शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्ह्यात १ लाख १२ हजार ३७९ शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले असून, त्यापैकी बँक खाते क्रमांक आधार क्रमांकाशी संलग्नित (लिंक) करण्यात करण्यात आलेल्या १ लाख ११ हजार २४५ शेतकºयांच्या याद्या शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आल्या आहेत. कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या शेतकºयांच्या गावनिहाय याद्या प्रसिद्ध करण्यासाठी पहिल्या टप्प्यात शासनामार्फत अकोला तालुक्यातील गोरेगाव खुर्द-गोरेगाव बु. आणि बाळापूर तालुक्यातील देगाव या दोन गावांतील शेतकºयांच्या याद्या सोमवारी शासनामार्फत आॅनलाइन प्राप्त झाल्या. प्राप्त झालेल्या पात्र ८१० शेतकºयांच्या गावनिहाय याद्या गोरेगाव खुर्द व देगाव या दोन गावांमध्ये प्रसिद्ध करण्यात आल्या. त्यामध्ये गोरेगाव खुर्द येथे ग्रामपंचायत कार्यालय, सेतू केंद्र, जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा, कॅनरा बँक व गोरेगाव बु. येथील संत गजानन महाराज मंदिर येथे पात्र शेतकºयांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या. तर देगाव येथे ग्रामपंचायत कार्यालय, सामान्य सुविधा केंद्र (सीएससी), सेंट्रल बँक शाखा, विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखा, स्टेट बँक शाखा इत्यादी ठिकाणी शेतकºयांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या. प्रसिद्ध करण्यात आलेल्या याद्यानुसार संबंधित शेतकºयांचे बँक खाते क्रमांक, आधार क्रमांक व कर्ज खात्यातील रक्कम यासंदर्भात बायोमेट्रिक पद्धतीने पडताळणी व प्रमाणीकरणाचे काम प्रशासनामार्फत सुरू करण्यात आले.
गावनिहाय पात्र शेतकरी अन् आधार पडताळणी!
कर्जमाफीसाठी पात्र शेतकºयांच्या याद्या गोरेगाव व देगाव या दोन गावांत प्रसिद्ध करण्यात आल्या. त्यानुसार दोन्ही गावांत ८१० शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले असून, त्यामध्ये गोरेगाव येथील ३९७ शेतकरी व देगाव येथील ४१३ शेतकºयांचा समावेश आहे. दोन्ही गावांतील पात्र शेतकºयांपैकी ३५१ शेतकºयांचे बँक खाते क्रमांक, आधार क्रमांक व कर्जखात्यातील रकमेची पडताळणी सोमवारी सायंकाळपर्यंत करण्यात आली.
जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शेतकºयांना प्रमाणपत्र वितरित!
कर्जमाफीसाठी पात्र शेतकºयांच्या गावनिहाय याद्या प्रसिद्ध करण्यात आल्यानंतर गोरेगाव व देगाव या दोन गावांत जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी भेट दिली. जिल्हाधिकाºयांच्या उपस्थितीत शेतकºयांचे खाते क्रमांक, आधार क्रमांक व कर्जखात्यातील रक्कम इत्यादी संदर्भात पडताळणी करण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते संबंधित शेतकºयांना कर्जमाफीच्या प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.