कोरोना लसीकरणासाठी अकोल्यात ८२ ‘आयएलआर’ दाखल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 10:48 AM2021-01-21T10:48:01+5:302021-01-21T10:48:35+5:30

CoronaVaccine अकोला मंडळातील पाचही जिल्ह्यांसाठी केंद्र शासनामार्फत ८२ आयएलआर आणि तीन डीप फ्रिजर प्राप्त झाले.

82 ILRs filed in Akola for corona vaccination | कोरोना लसीकरणासाठी अकोल्यात ८२ ‘आयएलआर’ दाखल!

कोरोना लसीकरणासाठी अकोल्यात ८२ ‘आयएलआर’ दाखल!

Next

अकोला : जिल्ह्यात कोविड लसीकरणाच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. लवकरच ही मोहीम ग्रामीण भागातही राबविण्याची तयारी सुरू आहे. त्या अनुषंगाने लस ठेवण्यासाठी आवश्यक असलेले ८३ लहान ‘आइस लाइन्ड रेफ्रिजिरेटर’ (आयएलआर) केंद्र शासनामार्फत अकोला मंडळाला प्राप्त झाले आहेत. आरोग्य उपसंचालक कार्यालयामार्फत बुधवारी पाचही जिल्ह्यांत आयएलआरचे वितरण करण्यात आले. सध्या जिल्ह्याच्या मुख्यालयी कोविड लसीकरण राबविण्यात येत आहे. येत्या काळात लसीकरण मोहीम आणखी व्यापक प्रमाणात राबविण्यात येणार असल्याने आरोग्य विभाग तशा तयारीत आहे. त्या अनुषंगाने बुधवारी आरोग्य विभागाच्या अकोला मंडळातील पाचही जिल्ह्यांसाठी केंद्र शासनामार्फत ८२ आयएलआर आणि तीन डीप फ्रिजर प्राप्त झाले. अकोला क्रिकेट क्बल मैदानामध्ये बुधवारी आयएलआर उतरविण्यात आले. येथूनच ते विभागातील पाचही जिल्ह्यांना वितरित करण्यात आले. हे आयएलआर तालुकास्तरावर, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रावर आवश्यकतेनुसार पाठविण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. जिल्ह्यासाठी कोविड लसीचा मोठा साठा उपलब्ध झाला आहे. मात्र, अद्यापही केंद्र शासनामार्फत ४० क्युबीक मीटर क्षमतेचे प्रस्तावित वॉक इन कूलर प्राप्त झाले नाही. लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात मोठ्या प्रमाणात लस मिळण्याची शक्यता आहे. मात्र, वेळेवर वॉक इन कूलर न मिळाल्याने कोविड लस ठेवण्याची पंचाईत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. लसीकरण मोहिमेत लसीच्या सुरक्षित साठवणुकीसोबतच विविध वैद्यकीय उपकरणांच्या वितरणासाठी आरोग्य उपसंचालक कार्यालयातील बायो मेडिकल इंजिनिअर नितीन सावळे, मुख्य औषध निर्माण अधिकारी प्रदीप पहाडे, वरिष्ठ औषध निर्माण अधिकारी राजेंद्र इंगळे, तंत्रज्ञ सतीश जोशी, शीत साखळी तंत्रज्ञ नंदकिशोर शिवरकर, शिपाई मोहम्मद मुश्ताक आदी परिश्रम घेत आहेत.

 

जिल्हानिहाय ‘आयएलआर’चे वितरण

 

जिल्हा - आयएलआरची संख्या

अकोला - ७

 

अकोला मनपा - ७

अमरावती - १२

 

अमरावती मनपा - ६

 

वाशिम - ७

 

 

बुलडाणा - २०

यवतमाळ - २३

 

मोठ्या आयएलआरची प्रतीक्षा

 

अमरावती मनपासाठी लहान आयएलआर व्यतिरिक्त ३ मोठे आयएलआर आणि ३ डीप फ्रिजर प्राप्त होणार होते. यापैकी तीन डीप फ्रिजर अमरावती आरोग्य विभागाला प्राप्त झाले असून, तीन मोठ्या आयएलआरची आरोग्य विभागाला प्रतीक्षा आहे. ही उपकरणे लवकरच अमरावती महापालिकेला हस्तांतरित करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

 

शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कोविड लसीकरणाची तयारी सुरू आहे. त्या अनुषंगाने बुधवारी विभागासाठी ८२ आयएलआर प्राप्त झाले. लस साठवणुकीसाठी आवश्यक क्षमता असून, आयएलआर आल्याने ती आणखी बळकट होणार आहे.

डॉ. राजकुमार चव्हाण, प्रभारी आरोग्य उपसंचालक, अकोला

Web Title: 82 ILRs filed in Akola for corona vaccination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.