पावसाळ्यात जिल्ह्यातील ८२ गावांना पुरांचा धोका; उपाययोजनांसाठी जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
By संतोष येलकर | Published: May 19, 2024 03:58 PM2024-05-19T15:58:44+5:302024-05-19T16:00:45+5:30
ग्राम आपत्ती व्यवस्थापन समित्यांच्या बैठका घेण्याची कार्यवाही सुरु
संतोष येलकर, अकोला: पावसाळ्यात जिल्ह्यातील नदीकाठच्या ८२ गावांत पूरपरिस्थिती निर्माण होण्याचा धोका असल्याच्या पार्श्वभूमीवर संबंधित गावांत उपाययोजना करण्यासाठी ग्राम आपत्ती व्यवस्थापन समित्यांच्या बैठका घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी जिल्ह्यातील तहसीलदारांना गेल्या आठवड्यात दिले. त्यानुसार जिल्ह्यातील सातही तहसील कार्यालयांमार्फत यासंदर्भात कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. पावसाळ्यात अतिवृष्टी व पुरामुळे जिल्ह्यातील सातही तालुक्यांतील नदी व नाल्याकाठची ८२ गावे बाधित होतात.
या पार्श्वभूमीवर पूरपरिस्थितीचा धोका लक्षात घेता, संबंधित गावांमध्ये पूर नियंत्रण आणि आवश्यक उपाययोजनांची कामे करण्यासाठी संबंधित गावांच्या ग्राम आपत्ती व्यवस्थापन समित्यांच्या बैठका घेण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी ९ मे रोजी मान्सून पूर्वतयारीच्या बैठकीत जिल्ह्यातील तहसीलदारांना दिले. त्यानुसार जिल्ह्यातील सातही तहसील कार्यालयांकडून पुरामुळे बाधित होणाऱ्या गावांतील ग्राम आपत्ती व्यवस्थापन समित्यांच्या बैठका घेण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
पुरामुळे बाधित होणारी गावांची अशी आहे संख्या!
तालुका - गावे
- अकोला १५
- बार्शिटाकळी १२
- अकोट १०
- तेल्हारा ११
- बाळापूर १०
- पातूर १०
- मूर्तिजापूर १४
पुरामुळे बाधित होणारी अशी आहेत गावे !
- अकोला तालुका : अकोला , म्हैसांग, एकलारा, कपिलेश्वर, वडद बु., दोनवाडा, धामना, चांगेफळ, म्हैसपूर, चांदूर, सांगवी बु., कुरणखेड, गोत्रा, आगर.
- बार्शिटाकळी तालुका : चिंचखेड, निंभोरा, तामशी, खांबाेरा, वरखेड, वाघजळी, दोनद खुर्द, टाकळी, राजंदा, सुकळी, वरखेड, सिंदखेड.
- अकोट तालुका : केळीवेळी, किनखेड, पळसोद, पनोरी, पिलकवाडी, कुटासा, मुंडगाव, अकोट, करोडी, वरुर.
- तेल्हारा तालुका : मनात्री बु., डवला, तळेगाव वडनेर, तळेगाव पातुर्डा, नेर, सांगवी, उमरी, पिवंदळ, दानापूर, सौंदळा, वारखेड.
- बाळापूर तालुका : वाडेगाव, बाभूळखेड, कासारखेड, हाता, अंदुरा, लोहारा, कवठा, हातरुण, रिधोरा, सोनाळा.
- पातूर तालुका : पास्टुल, भंडारज खुर्द, आगीखेड, कोठारी बु., चोंढी, विवरा, आलेगाव, वहाळा बु., सस्ती, तुलंगा.
- मूर्तिजापूर तालुका : हेंडज, पिंगळा, कोळसरा, भटोरी, दातवी, सांगवी, दुर्गवाडा, दापूरा, हिवरा कोरडे, लाखपुरी, माना, खांदला, पोही, उनखेड.