हिमतीच्या जोरावर ८२ वर्षीय आजोबांनी कोरोनाला केले चितपट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:14 AM2021-06-01T04:14:39+5:302021-06-01T04:14:39+5:30

रवी दामोदर अकोला : कोरोनाने राज्यासह जिल्ह्यात थैमान घातले आहे. कोरोनाच्या रुग्णसंख्येबरोबरच दैनंदिन मृत्यूंची संख्याही वेगाने वाढत असल्याने नागरिकांची ...

82-year-old grandfather coronated Corona on the strength of courage! | हिमतीच्या जोरावर ८२ वर्षीय आजोबांनी कोरोनाला केले चितपट!

हिमतीच्या जोरावर ८२ वर्षीय आजोबांनी कोरोनाला केले चितपट!

Next

रवी दामोदर

अकोला : कोरोनाने राज्यासह जिल्ह्यात थैमान घातले आहे. कोरोनाच्या रुग्णसंख्येबरोबरच दैनंदिन मृत्यूंची संख्याही वेगाने वाढत असल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे. असे असतानाही पातूर तालुक्यातील कार्ला येथील एका ८२ वर्षीय आजोबांनी हिंमत, जिद्द व आत्मविश्वासाच्या जोरावर कोरोनाला चितपट केले. त्यांनी या वयात कोरोनावर मात केल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

जगण्याची तीव्र इच्छा, डॉक्टरांचे परिश्रम आणि कुटुंबाने दिलेल्या हिमतीच्या बळावर ८२ वर्षीय आजोबांनी कोरोनाला मात दिली. लक्ष्मण घायवट (रा. कार्ला, ता. पातूर) असे या आजोबांचे नाव आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनामार्फत गावा-गावात कोरोना चाचणी शिबिराचे आयोजन केले जात आहे. ग्रामीण भागात कोरोना चाचणीला अल्पप्रतिसाद मिळत आहे. गावातून कोरोना हद्दपार व्हावा, या दृष्टिकोनातून गावात जास्तीत जास्त नागरिकांनी कोरोनाची चाचणी करणे गरजेचे आहे. हे लक्षात घेऊन कोरोनाची लक्षणे नसतानाही ८२ वर्षीय आजोबा लक्ष्मणराव घायवट यांनी पुढाकार घेत गावात आयोजित शिबिरात कोरोनाची चाचणी केली. या शिबिरात त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यामुळे नातेवाईक घाबरले; मात्र आजोबांनी घाबरून न जाता कोरोनाला चितपट देण्याची खूणगाठ बांधली होती. अखेर जगण्याची इच्छा, कुटुंबाने घेतलेली काळजी व हिमतीच्या बळावर आजोबांनी वय वर्षे ८२ असतानाही कोरोनाला चितपट करीत लढाई जिंकली. (पासपोर्ट फोटो आहे.)

-------------------------------

‘जो डर गया समझो मर गया!’

कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने नातेवाईकांसह कुटुंबातील सदस्यांच्या मनात भीती पसरली होती; मात्र लक्ष्मणराव घायवट यांनी कुटुंबातील सदस्यांना धीर दिला. त्यानंतर कुटुंबातील सदस्य त्यांचा मुलगा रवी घायवट व सून वैशाखी घायवट यांनी कोरोनाविषयक नियमांचे पालन करीत वडिलांची काळजी घेतली. अखेर लक्ष्मणराव घायवट कुटुंबाने दिलेल्या हिंमतीने त्यांनी कोरोनाला मात दिली. कोरोनाला हरवायचे असेल, तर मनातून भीती जाणे गरजेचे आहे, असे लक्ष्मणराव घायवट यांनी सांगितले.

--------------------------------

आरोग्य विभागाचा होता ‘वाॅच’!

लक्ष्मणराव घायवट यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांना कोरोनाची सौम्य लक्षणे असल्याने होम क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आलेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टरांचा ‘वॉच’ होता. गावातील वैद्यकीय अधिकारी व आशा सेविकेमार्फत दररोज आजोबांची ऑक्सिजन लेव्हल, ताप मोजण्यात येत होता. डॉक्टरांच्या परिश्रमाने कोरोनाला हरविणे सोपे झाल्याचे घायवट यांनी सांगितले.

----------------------------------------------

Web Title: 82-year-old grandfather coronated Corona on the strength of courage!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.