‘मैत्रेय’मध्ये अकोला जिल्ह्यातील ८२ हजार गुंतवणूकदारांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2018 12:49 PM2018-12-09T12:49:56+5:302018-12-09T12:50:18+5:30
अकोला: राज्यभरातील लाखो नागरिकांना पैसे दुपटीचे आमिष देणाऱ्या मैत्रेय प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने अकोला जिल्ह्यातील तब्बल ८२ हजारावर अधिक गुंतवणूकदारांची तब्बल ५३ कोटी रुपयांनी फसवणूक केल्याची माहिती आता समोर आली आहे.
अकोला: राज्यभरातील लाखो नागरिकांना पैसे दुपटीचे आमिष देणाऱ्या मैत्रेय प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने अकोला जिल्ह्यातील तब्बल ८२ हजारावर अधिक गुंतवणूकदारांची तब्बल ५३ कोटी रुपयांनी फसवणूक केल्याची माहिती आता समोर आली आहे. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणात फसवणूक झालेल्यांनी मोबदला मिळण्यासाठी आता पुन्हा कुणाच्याही आमिषाला बळी न पडण्याचे आवाहन केले आहे.
मैत्रेय कंपनीने विविध प्रलोभने दाखवून कोटयवधी रुपये गोळा केले होते. गुंतवणुकदारांसाठी दलालांची मोठी साखळीच या कंपनीने जिल्ह्यात तयार केली होती. गुंतवणुकीवर मोठा परतावा तसेच हॉटेल, प्लॉटमध्ये मालकी हक्काचे प्रलोभन दाखवत मैत्रेयच्या संचालकांनी विविध १४ कंपन्यांच्या माध्यमातून देशभरातील लाखो गुंतवणूकदारांकडून रकमा स्वीकारल्या होत्या; परंतु त्याचा परतावा दिला नाही. त्यामुळे या प्रकरणाच्या तक्रारी झाल्यानंतर या प्रकरणाचा तपास रामदास पेठ पोलीस करीत आहेत. आजपर्यंत पोलिसांकडे फसवणूक झालेल्या अडीच हजार गुंतवणुकदारांनी धाव घेतली. तर जिल्ह्यातील एकूण ८२ हजार गुंतवणूकदारांची फसवणूक झाली आहे. या ८२ हजार गुंतवणूकदारांकडून मैत्रेयने तब्बल ५३ कोटी रुपये लुबाडल्याचे पोलीस तपासात समोर आला आहे. मैत्रेयच्या संचालकांवर राज्यात तसेच देशभरात विविध ठिकाणी सुमारे ३० पेक्षा अधिक गुन्हे दाखल झाले आहेत. मैत्रेय घोटाळा व त्याच्या परताव्याची दखल घेत राज्य शासनाकडे राज्य पातळीवर ३० जिल्ह्यातील तपास अधिकाºयांची एक समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीने मैत्रेयच्या राज्य, देशातील विविध ठिकाणी तसेच परदेशातील मालमत्तांचा शोध घेऊन त्याला सील ठोकले आहेत. या मालमत्तांचे शासकीय दरानुसार मूल्यांकन केले आहे. आता त्याचे बाजारभावानुसार मूल्यांकन तयार करून त्यांच्या प्रत्यक्ष लिलाव प्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यानंतरच गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळणार असल्याची एक आशा निर्माण झाली आहे.