जिल्ह्यात सात दिवसांत ८२.७ मिमी पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:22 AM2021-07-14T04:22:17+5:302021-07-14T04:22:17+5:30

जिल्ह्यात ८१ टक्के क्षेत्रात पेरणी जुलै महिना उजाडला तरी ५० टक्के क्षेत्रातही पेरणी झाली नव्हती. गत ७ दिवसांपासून सुरू ...

82.7 mm rainfall in seven days in the district | जिल्ह्यात सात दिवसांत ८२.७ मिमी पाऊस

जिल्ह्यात सात दिवसांत ८२.७ मिमी पाऊस

Next

जिल्ह्यात ८१ टक्के क्षेत्रात पेरणी

जुलै महिना उजाडला तरी ५० टक्के क्षेत्रातही पेरणी झाली नव्हती. गत ७ दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरणी सुरू केली. जिल्ह्यात आतापर्यंत ८१ टक्के क्षेत्रात पेरणी आटोपली आहे. पातूर तालुक्यात सर्वाधिक २७,५४० हेक्टर म्हणजेच ११३ टक्के क्षेत्रात पेरणी झाली.

गतवर्षीपेक्षा पाऊस कमीच!

जिल्ह्यात काही दिवसांपासून पाऊस सुरू असला तरी गतवर्षीपेक्षा यंदा कमीच पावसाची नोंद झाली आहे. आतापर्यंत १७८.० मिमी नोंद झाली असून, याच वेळेस मागील वर्षी १९८.५ मिमी पाऊस झाला होता.

बाळापूर, अकोट, अकोला तालुक्यात सर्वांत कमी पाऊस

यंदाच्या मान्सूनमध्ये जिल्ह्यातील काही तालुक्यात चांगला पाऊस होत आहे; परंतु अकोला, बाळापूर व अकोट या तालुक्यांमध्ये सर्वांत कमी पावसाची नोंद झाली आहे. अकोला १४४.६ मिमी, अकोट १२१.६ मिमी व बाळापूर येथे १३०.१ मिमी पाऊस झाला.

Web Title: 82.7 mm rainfall in seven days in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.