विभागात चार महिन्यांत ८४५ जणांना अर्धांगवायू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:15 AM2021-05-29T04:15:35+5:302021-05-29T04:15:35+5:30

अशी आहे विभागाची स्थिती (जानेवारी ते एप्रिल) जिल्हा - २०२० रुग्ण - ...

845 people paralyzed in four months in the department | विभागात चार महिन्यांत ८४५ जणांना अर्धांगवायू

विभागात चार महिन्यांत ८४५ जणांना अर्धांगवायू

Next

अशी आहे विभागाची स्थिती (जानेवारी ते एप्रिल)

जिल्हा - २०२० रुग्ण - २०२१ रुग्ण

अकोला - ५६ - ६३

अमरावती - १७० -१७४

बुलडाणा - ४६ - १७१

वाशीम - ३२ - ५२

यवतमाळ - ८६ - १०७

-------------------------

एकूण - ६७० - ८४५

विभागात आतापर्यंत १० हजार २७२ रुग्ण

२०१४ पासून रुग्णवाहिका आणि प्रशिक्षित डॉक्टर अर्धांगवायूच्या रुग्णांना सेवा देत आहेत. पाच जिल्ह्यांत या काळात एकूण १० हजार २७२ रुग्ण आढळले आहेत. अकोला १२८४, अमरावती ३४६८, बुलडाणा १६८५, वाशीम १०१०, यवतमाळ २८२५ असे रुग्ण आढळले आहेत.

छोट्या रक्तवाहिनी ब्लॉक होतात

तज्ज्ञांच्या मते, ज्या रुग्णांना स्टेरॉइड दिले गेले आहे. त्यांच्या रक्तातील साखरेच्या प्रमाणात वाढ होते. त्यामुळे रक्त घट्ट होऊन छोट्या रक्तवाहिनीत ब्लॉक होतात. परिणामी स्ट्रोक येतो. त्यामुळे संबंधित कोणतीही लक्षणे दिसताच तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या, असे डॉक्टर सांगतात.

गोल्डन अवर्समध्ये उपचार महत्त्वाचे

स्ट्रोकला सामान्यत: अर्धांगवायू मानले जाते. अर्धांगवायू हा एक हात किंवा पायाचा आजार असल्याची जनसामान्यांची धारणा आहे. त्यामुळे घरगुती उपाय व परिसरात प्रचलित असणाऱ्या उपचार पद्धतीवर जास्त भर दिला जातो. ज्यामुळे गोल्डन अवर्समध्ये रुग्णाला उपचार मिळत नाही व रुग्ण दगावण्याची शक्‍यता वाढते. हे थांबविण्यासाठी जनजागृती होणे आवश्यक आहे. प्रत्येकाने समजून घेतले पाहिजे की पक्षाघात हा मेंदूशी संबंधित एक आजार आहे आणि सामान्यत: ब्रेन अटॅक म्हणून संबोधले जाते. वेळेवर वैद्यकीय मदत जीव वाचू शकते आणि अपंगत्व टाळू शकते.

१०८ रुग्णवाहिका सेवेच्या माध्यमातून मागील चार महिन्यांत अकोल्यासह विभागातील अर्धांगवायूच्या रुग्णांना सेवा देण्यात आली. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी अर्धांगवायूच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे चित्र दिसून आले.

- डॉ. मोहम्मद फैझान जहागीरदार, १०८ रुग्णवाहिका, जिल्हा समन्वयक

Web Title: 845 people paralyzed in four months in the department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.