८५ गुन्हेगारांना शहरात ‘नो एंट्री’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2017 01:55 PM2017-10-01T13:55:04+5:302017-10-01T13:55:04+5:30
सचिन राऊत
अकोला - हिंदु बांधवाचे नवदुर्गा देवी विसर्जण, बौध्द बांधवाचा मोठा उत्सव धम्मचक्र प्रवर्तन दिन, मुस्लीम बांधवांचा मोहर्रम या तीनही उत्सवानिमीत्त कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी शहरातील ८५ गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे. पोलीस प्रशासनाव्दारे दिलेल्या प्रस्तावानंतर महसुल प्रशासनाने या गुन्हेगारांना तडीपार केले आहे.
हिंदु, मुस्लीम व बौध्द बांधवाचा धार्मिक सन उत्सव दोन ते तीन दिवसा सोबत आला आहे. त्यामूळे काही समाजकंटकांकडून अनुचीत प्रकार घडण्याची शक्यता असल्याने पोलिस प्रशासनाव्दारे या गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करण्यासाठी प्रस्ताव उपविभागीय अधिकाºयांकडे सादर करण्यात आले होते. या प्रस्तावाला उपविभागीय अधिकारी यांनी मंजुरी दिल्यानंतर ८५ गुन्हेगारांना शहरातून तडीपार करण्यात आले आहे. यामध्ये शहरातील सातही पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या तीन गुन्हेगारांना सहा महिन्यांसाठी तडीपार करण्यात आले आहे, तर तीन गुन्हेगारांना तीन महिन्यांसाठी तडीपार करण्यात आले आहे. यासोंबतच तब्बल ७९ गुन्हेगारांना दोन दिवसांसाठी तडीपार करण्यात आले आहे. सन उत्सवाच्या काळात शहरातील गुंड प्रवृत्तीच्या तब्बल ८५ गुन्हेगारांना तडीपार करण्यात आल्याने शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहणार असल्याचा विश्वास पोलिस खात्याच्या वरीष्ठ अधिकाºयांनी व्यक्त केला आहे.
शहरातील कायदा व सुव्यवस्था कायम राहावी यासाठी पोलीस प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात आली आहे. याचाच एक भाग म्हणूण शहरातील सात पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ८५ गुन्हेगारांच्या तडीपारीचे प्रस्ताव तयार करण्यात आले होते. त्यानंतर या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली असून या गुन्हेगारांना दोन दिवसांसाठी, तीन महिन्यांसाठी आणि सहा महिन्यांसाठी तडीपार करण्यात आले आहे.
एम. राकेश कलासागर,पोलीस अधीक्षक, अकोला.