‘जलयुक्त’ साठी ८५ कोटींचा आराखडा!
By admin | Published: June 9, 2017 03:50 AM2017-06-09T03:50:04+5:302017-06-09T03:50:04+5:30
१४४ गावांमध्ये कामे प्रस्तावित; जिल्हास्तरीय समितीची मंजुरी.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सन २०१७-१८ या वर्षात जिल्ह्यातील निवड करण्यात आलेल्या १४४ गावांमध्ये ह्यजलयुक्त शिवारह्णच्या कामांसाठी ८५ कोटी रुपयांच्या आराखड्याला गुरुवारी जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सन २०१७-१८ या वर्षात जिल्ह्यातील अकोला, अकोट, बाळापूर, बार्शीटाकळी, पातूर, तेल्हारा व मूर्तिजापूर या सातही तालुक्यांतील १४४ गावांची निवड करण्यात आली आहे. निवड करण्यात आलेल्या गावांमध्ये ह्यजलयुक्त शिवारह्णची कामे करण्यासाठी संबंधित यंत्रणांकडून तयार करण्यात आलेल्या आराखड्यांच्या आधारे जिल्ह्यातील कामांचा आराखडा निश्चित करण्याच्या मुद्यावर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय समितीची बैठक घेण्यात आली. जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या या बैठकीत जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्ह्यातील १४४ गावांमध्ये करावयाच्या कामांसाठी ८५ कोटी रुपयांचा आराखडा मंजूर करण्यात आला.
आराखड्यातील मंजूर प्रस्तावित ह्यजलयुक्त शिवारह्णची कामे पावसाळा संपल्यानंतर संबंधित यंत्रणांकडून सुरू करण्यात येणार आहेत. जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीला जिल्हा परिषद प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभ्२ााष पवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र निकम यांच्यासह जलसंधारण, पाटबंधारे, लघुसिंचन (जलसंधारण), वन विभाग, जिल्हा परिषद लघुसिंचन, पाणीपुरवठा व रोहयो विभाग इत्यादी यंत्रणांचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्ह्यातील निवड करण्यात आलेल्या गावांमध्ये करावयाच्या कामांचा जिल्हास्तरीय आराखडा मंजूर करण्यात आला. त्यामध्ये प्रामुख्याने सिमेंट नाला बांध, नाला खोलीकरण व रुंदीकरण, गाळ काढणे, बंधारे, ढाळीचे बांध, शेततळे, खोदतळे, समतल चर, ह्यमागेल त्याला शेततळे ह्ण योजनेंतर्गत शेततळ्यांची कामे प्रस्तावित आहेत.