पश्चिम व-हाडात ८५ टक्क्यांवर शिधापत्रिका ‘आधार लिंक’!
By admin | Published: October 9, 2016 02:13 AM2016-10-09T02:13:43+5:302016-10-09T02:13:43+5:30
धान्याचे वितरण लवकरच होणार ‘ऑनलाइन’
संतोष येलकर
अकोला, दि. 0८- सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत राज्यात लवकरच 'ऑनलाइन' पद्धतीने धान्य व रॉकेलचे वितरण सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी शिधापत्रिका क्रमांक आधार क्रमांकाशी संलग्नित (लिंक) करण्याचे काम पुरवठा विभागामार्फत सुरू आहे. त्यामध्ये अमरावती विभागातील अकोला, बुलडाणा व वाशिम या तीन जिल्हय़ांत ७ ऑक्टोबरपर्यंत शिधापत्रिका आधार क्रमांकाशी ह्यलिंकह्ण करण्याचे काम ८५ टक्क्यांपेक्षा अधिक काम पूर्ण झाले आहे.
सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत दारिद्रय़रेषेखालील (बीपीएल) शिधापत्रिकाधारक आणि अंत्योदय योजनेंतर्गत शिधापत्रिकाधारकांना दरमहा धान्य आणि रॉकेलचे वितरण करण्यात येते. राज्यातील शिधापत्रिकाधारकांना रास्त भाव दुकानांमधून वितरित करण्यात येणारे धान्य व रॉकेल ऑनलाइन बायोमेट्रिक पद्धतीने वितरित करण्याचे शासनामार्फत ठरविण्यात आले आहे. त्यासाठी पुरवठा विभागामार्फत शिधापत्रिका क्रमांक आधार क्रमांकाशी संलग्नित करण्याचे काम गतवर्षीपासून सुरू आहे. त्यामध्ये ७ ऑक्टोबरपर्यंत अमरावती विभागातील अकोला, बुलडाणा व वाशिम या तीन जिल्हय़ांत ८५ टक्क्यांपेक्षा अधिक शिधापित्रका आधार क्रमांकासोबत संलग्नित करण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. शिधापत्रिका आधार लिंक करण्याचे १0 ते १५ टक्के काम अद्याप बाकी आहे. शिधापत्रिका क्रमांक आधार क्रमांकाशी संलग्नित करण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर लवकरच शासनामार्फत शिधापत्रिकाधारकांना ऑनलाइन धान्य आणि केरोसीन वितरण सुरू करण्यात येणार आहे.
पुरवठा मंत्र्यांनी घेतला आढावा; ऑनलाइन धान्य वितरणाचे दिले संकेत!
अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी शुक्रवार, ७ ऑक्टोबर रोजी अकोल्यात अकोला व वाशिम या दोन जिल्हय़ांतील पुरवठा विभागाचे अधिकारी व तहसीलदारांची बैठक घेऊन शिधापत्रिकांच्या आधार लिंक कामाचा आढावा घेतला. शिधापत्रिकाधारकांना लवकरच ऑनलाइन पद्धतीने धान्याचे वितरण सुरू करण्यात येणार असल्याचे संकेत त्यांनी दिले. त्यासाठी शिधापत्रिकांच्या आधार ह्यलिंकह्णचे काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देशही पुरवठा मंत्र्यांनी दिले.
तीन जिल्हय़ांत शिधापत्रिका आधार लिंकचे पूर्ण झालेले काम!
जिल्हा टक्केवारी
अकोला ८८ टक्के
बुलडाणा ९४ टक्के
वाशिम ८६ टक्के