अकोटात ८५० किलो मांस जप्त, पाच जणांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2018 05:03 PM2018-10-28T17:03:15+5:302018-10-28T17:03:24+5:30
अकोट : स्थानिक शौकत अली चौकातील कुरेशी पुऱ्यात अकोट शहर पोलिसांनी रविवारी पहाटे धाड टाकून ८५० किलो मांस व इतर साहित्य जप्त केले. या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली.
अकोट : स्थानिक शौकत अली चौकातील कुरेशी पुऱ्यात अकोट शहर पोलिसांनी रविवारी पहाटे धाड टाकून ८५० किलो मांस व इतर साहित्य जप्त केले. या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली. पाचही आरोपींना न्यायलयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या कारवाईमुळे अकोट शहरात खळबळ उडाली आहे.
अकोट शहरातील कुरेशी पुरा येथे गुरांची अवैध कत्तल करण्यात येत असल्याची माहिती अकोट शहर पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे शहर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकातील अधिकारी आणि कर्मचाºयांनी २८ आॅक्टोबर रोजी धाड टाकली. यावेळी पाच जणांकडे अवैध मांस असल्याचे आळल्याने त्यांना पोलिसांनी अटक केली.आरोपींमध्ये वसीम अहमद जहुर अहमद (२०) रा.कुरेशी पुरा, जावेद अहमद खाजा मिया (३०) रा,आंबोळीवेस, तौफिक अहमद अब्दुल हाफिज (२१) रा. कुरेशीपुरा, अब्दुल रशीद अब्दुल हबीब (५२), रा. आंबोळी वेस , इरफान अहमद अब्दुल मजीद (३५), कुरेशीपुरा आदींचा समावेश आहे. या आरोपींकडून पोलिसांनी सात कुºहाडी, सात सुरे व ८५० किलो गोवंश मास एकत्रीत किंमत एक लाख ७० हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील सोनवणे, पोलिस निरीक्षक गजानन शेळके ह्यांचे मार्गदर्शनात साहाय्यक पोलिस निरीक्षक दयनोबा फड, पोलिस उपनिरीक्षक महेंद्र गवई,सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक गणेश पाटील, हेड कॉन्स्टेबल संजय घायल, शिंदे, पोलिस कर्मचारी अघडते, पठाण, वीरेंद्र लाड, सोळंके, बेले, नरवाडे, चिंचोळकर व महिला कर्मचारी गीता यांनी केली. (तालुका प्रतिनिधी)