अकोला जिल्ह्यात कोविडच्या ८५.६९ टक्के खाटा रिक्त!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2020 10:43 AM2020-11-17T10:43:47+5:302020-11-17T10:47:01+5:30
Akola coronavirus News जिल्ह्यातील डेडिकेटेड कोविड रुग्णालयातील ८५.६९ टक्के खाटा रिक्त आहेत
अकोला: गत दोन आठवड्यांपासून जिल्ह्यात कोरोनाच्या ॲक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत हळूहळू वाढ होत असली, तरी बहुतांश रुग्ण हे होम क्वारंटीनमध्ये आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील डेडिकेटेड कोविड रुग्णालयातील ८५.६९ टक्के खाटा रिक्त आहेत. कोविडच्या रुग्णांना प्रभावी उपचार मिळावा या अनुषंगाने सर्वोपचार रुग्णालयासह इतर शासकीय व खासगी, असे १३ रुग्णालये कोविडसाठी अधिग्रहित करण्यात आली होती. यामध्ये चार शासकीय, तर ९ खासगी रुग्णालय आणि हॉटेल्सचा समावेश आहे. अधिग्रहित रुग्णालयांमध्ये ८३९ खाटा कोविड रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. त्यापैकी केवळ १२० खाटांचा वापर कोविड रुग्णांसाठी केला जात आहे. तर उर्वरित ७१९ खाटा रिक्त आहेत. यामध्ये ऑक्सिजन खाटांचाही समावेश आहे. म्हणजेच एकूण खाटांच्या तुलनेत केवळ १४.३१ टक्के खाटांवर रुग्ण उपचार घेत आहेत. तर बहुतांश रुग्णांना लक्षणेच नाहीत किंवा सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांना होम क्वारंटीन ठेवण्यात आले आहे. परिणामी ८५.६९ टक्के खाटा रिक्त आहेत.