राज्यात ८६ हजार सौरपंप कार्यान्वित

By Atul.jaiswal | Published: August 3, 2021 10:54 AM2021-08-03T10:54:00+5:302021-08-03T10:54:16+5:30

86,000 solar pumps operational in the state : राज्यातील ८५ हजार ९६३ शेतकऱ्यांकडे तीन, पाच व ७.५ अश्वशक्तीचे सौर कृषिपंप कार्यान्वित करण्यात आले आहेत.

86,000 solar pumps operational in the state | राज्यात ८६ हजार सौरपंप कार्यान्वित

राज्यात ८६ हजार सौरपंप कार्यान्वित

googlenewsNext

- अतुल जयस्वाल

अकोला : शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेतून गती देण्यात आली असून, आतापर्यंत राज्यातील ८५ हजार ९६३ शेतकऱ्यांकडे तीन, पाच व ७.५ अश्वशक्तीचे सौर कृषिपंप कार्यान्वित करण्यात आले आहेत. या सर्व शेतकऱ्यांना दिवसा विनाव्यत्यय वीजपुरवठा उपलब्ध झाला असून वीजबिलांतूनदेखील मुक्तता झाली आहे. ( 86,000 solar pumps operational in the state )

पारंपरिक पद्धतीने कृषिपंपाची वीजजोडणी न झालेले व महावितरणकडे वीजजोडणीसाठी पैसे भरून प्रलंबित असलेल्या कृषिपंपांना सौरऊर्जेद्वारे दिवसा वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेतून पारेषणविरहित नवीन वीजजोडण्या देण्यात येत आहेत. तसेच अतिदुर्गम व आदिवासी भागातील शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात येत आहे. त्यासाठी सौर कृषिपंपाच्या आधारभूत किमतीपैकी सर्वसाधारण गटासाठी १० टक्के तर अनुसूचित जाती/जमाती गटातील शेतकऱ्यांसाठी ५ टक्के लाभार्थी हिस्सा आहे.

मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेअंतर्गत एक लाख सौर कृषिपंप आस्थापित करण्याचे उद्दिष्ट आहे. राज्यातून आतापर्यंत २ लाख ४० हजार ६१७ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी ९७ हजार ९ लाभार्थ्यांनी मागणी पत्राचा (डिमांड नोट) भरणा केला आहे. तर ९६ हजार १९१ लाभार्थ्यांनी स्वतः निवडसूचीतील संबंधित पुरवठादारांची निवड केली आहे. त्यातील ८५ हजार ९६३ सौर कृषिपंप आस्थापित करण्यात आले आहेत.

 

प्रादेशिक विभागनिहाय अशी आहे आकडेवारी

प्रादेशिक विभाग    आस्थापित कृषिपंप

औरंगाबाद              ४६ हजार ७००

नागपूर                  २० हजार १९९

कोकण                 १३ हजार ९१

पुणे                         ५ हजार ९७३

 

१ लाख २४ हजार अर्ज नामंजूर

आवश्यक कागदपत्र जोडलेले नसणे, स्थळ तपासणीनंतर कृषिपंपाची वीजजोडणी आढळून येणे, जलस्रोत नसणे, विहीर किंवा कूपनलिका ६० मीटरपेक्षा खोल असणे तसेच डिमांड नोट दिल्यानंतरही लाभार्थी हिस्सा न भरणे आदी कारणांमुळे १ लाख २४ हजार ६९२ अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत.

Web Title: 86,000 solar pumps operational in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.