८६,६२२ नागरिकांनी दुसऱ्या डोसची तारीख ओलांडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:23 AM2021-09-15T04:23:59+5:302021-09-15T04:23:59+5:30
जिल्ह्यातील १४,२४,२६८ नागरिकांना लस देण्याचे उद्दिष्ट असून, आतापर्यंत ७,७३,५१८ जणांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. एकूण उद्दिष्टाच्या ३८.४६ टक्के ...
जिल्ह्यातील १४,२४,२६८ नागरिकांना लस देण्याचे उद्दिष्ट असून, आतापर्यंत ७,७३,५१८ जणांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. एकूण उद्दिष्टाच्या ३८.४६ टक्के लोकांनी पहिला, तर १५.८३ टक्के लोकांनी दुसरा डोस घेतला आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका पाहता जिल्ह्यातील नागरिकांना लसीचे दोन्ही डोस देण्यासाठी आरोग्य विभाग सरसावला आहे.
कोणत्या लसीचे किती ड्यू?
कोविशिल्डचा पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस ८४ दिवसांनी देण्यात येतो. जिल्ह्यात कोविशिल्डचा पहिला डोस घेतलेल्यांपैकी ६८,२२८ नागरिकांची ड्यू डेट उलटून गेली आहे. कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेतलेल्यांपैकी १८,३९४ जणांची दुसरा डोस घेण्याची २८ दिवसांची मुदत उलटून गेली असून, त्यांनी दुसरा डोस घेणे गरजेचे आहे.
ग्रामीण भागात सर्वाधिक
दुसरा डोस घेण्याची तारीख उलटून गेलेले सर्वाधिक नागरिक ग्रामीण भागातील आहेत. ग्रामीण भागातील तब्बल ५०,९३५ जणांनी दुसरा डोस घेणे गरजेचे आहे. अकोला शहरातील २६,६६५ तर तालुक्याच्या शहरांमधील ९,०२२ नागरिकांची दुसरा डोस घेण्याची ड्यू डेट उलटून गेली आहे.
कोरोना अजून संपलेला नाही, त्यामुळे लसीचे दोन्ही डोस पूर्ण करणे गरजेचे आहे. पहिला डोस घेतलेल्यांनी शक्य तितक्या लवकर आधी घेतलेल्या लसीचाच दुसरा डोस घेतला पाहिजे. जिल्ह्यात दोन्ही लसींचे डोस मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत.
- डॉ. मनीष शर्मा, जिल्हा समन्वयक, कोविड लसीकरण, अकोला