आयकरदात्या ८,८४४ शेतकऱ्यांनी परत केली नाही ‘पेन्शन’ची रक्कम !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:14 AM2021-06-01T04:14:53+5:302021-06-01T04:14:53+5:30
अकोला : प्रधानमंत्री किसान (पीएम किसान) सन्मान निधी योजनेंतर्गत जिल्ह्यात आयकरदात्या १० हजार ९२३ शेतकऱ्यांना त्यांनी घेतलेल्या पेन्शनची रक्कम ...
अकोला : प्रधानमंत्री किसान (पीएम किसान) सन्मान निधी योजनेंतर्गत जिल्ह्यात आयकरदात्या १० हजार ९२३ शेतकऱ्यांना त्यांनी घेतलेल्या पेन्शनची रक्कम परत करण्याच्या नोटीस गत नोव्हेंबरमध्ये जिल्हा प्रशासनामार्फत बजावण्यात आल्या. त्यापैकी फेब्रुवारीअखेरपर्यंत २ हजार ७९ शेतकऱ्यांनी १ कोटी ८० लाख ७४ हजार रुपयांची रक्कम परत केली असून, उर्वरित ८ हजार ८४४ आयकरदात्या शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या नोटिसीला ठेंगा दाखवत, रक्कम अद्याप परत केली नाही.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेेंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी तीन हप्त्यांत प्रत्येकी सहा हजार रुपये ‘पेन्शन’ दिली जाते. त्यामध्ये प्रत्येक हप्त्यात दोन हजार रुपयांची रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्यात येते. त्यामध्ये आयकरदात्या शेतकऱ्यांनी योजनेंतर्गत पेन्शनची घेतलेली रक्कम शासन आदेशानुसार परत घेण्याची कार्यवाही सुरू आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत जिल्ह्यात एकूण २ लाख २२ हजार ९३२ लाभार्थी असून, त्यापैकी १० हजार ९२३ आयकरदात्या शेतकऱ्यांना त्यांनी घेतलेली ८ कोटी २२ लाख ३२ हजार रुपयांची रक्कम परत करण्याच्या नोटीस गत नोव्हेंबरमध्ये जिल्हा प्रशासनामार्फत बजावण्यात आल्या आहेत. त्यानुसार गत फेब्रुवारीअखेरपर्यंत २ हजार ७९ शेतकऱ्यांनी १ कोटी ८० लाख ७४ हजार रुपयांची रक्कम केली असून, उर्वरित ८ हजार ८४४ आयकरदात्या शेतकऱ्यांनी ‘पेन्शन’ची रक्कम अद्याप परत केली नाही.
पीएम किसान पेन्शन योजनेचा आढावा
पीएम किसान योजनेचे
जिल्ह्यातील लाभार्थी
२,२२,९३२
पैसे परत करा म्हणून नोटीस पाठविलेले शेतकरी
१०,९२३
आतापर्यंत पैसे परत केलेले शेतकरी
२०७९
पैसे परत करणे बाकी असलेले शेतकरी
८८४४
आतापर्यंत १ कोटी ८० लाख वसूल
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत जिल्ह्यात आयकरदात्या दहा हजार ९२३ शेतकऱ्यांकडून ८ कोटी २२ लाख ३२ हजार रुपये वसूल करावयाचे आहेत. ही रक्कम परत करण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत संबंधित शेतकऱ्यांना नोटीस पाठविल्या. मात्र त्यापैकी आतापर्यंत २ हजार ७९ शेतकऱ्यांकडून १ कोटी ८० हजार ७४ हजार रुपयांची रक्कम वसूल करण्यात आली असून, उर्वरित ८ हजार ८४४ शेतकऱ्यांकडून ६ कोटी ४१ लाख ५८ हजार रुपयांची रक्कम वसूल करण्याची प्रक्रिया अद्याप बाकी आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत शासनाच्या आदेशानुसार जिल्ह्यात आयकरदात्या १० हजार ९२३ शेतकऱ्यांना पेन्शनची रक्कम परत करण्याच्या नोटीस पाठविण्यात आल्या आहेत. त्यापैकी २ हजार ७९ शेतकऱ्यांकडून १ कोटी ८० हजार ७४ हजार रुपयांची रक्कम वसूल करण्यात आली असून, उर्वरित ८ हजार ८४४ आयकरदात्या शेतकऱ्यांकडून रक्कम वसूल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
संजय खडसे
निवासी उपजिल्हाधिकारी