अंदुरा येथे आगीत ९८० पेंडी कडबा खाक
By Admin | Published: March 3, 2017 02:09 AM2017-03-03T02:09:01+5:302017-03-03T02:09:01+5:30
बाळापूर तालुक्यातील अंदुरा येथे लागलेल्या आगीत ९८० कडब्याच्या पेंड्या खाक झाल्याची घटना २८ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजेदरम्यान घडली.
अंदुरा, दि.२ : बाळापूर तालुक्यातील अंदुरा येथे लागलेल्या आगीत ९८० कडब्याच्या पेंड्या खाक झाल्याची घटना २८ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजेदरम्यान घडली.
अंदुरा येथील शेतकरी भगतसिंग गुलाबसिंग राजपूत (वय ५७) यांच्या शेतातील कडब्याच्या पेंड्या घरी आणून पाळीव जनावरांच्या चाऱ्याची लबगब सुरू असताना अचानक लागलेल्या आगीत राजपूत यांचा जनावरांच्या चाऱ्याचा पूर्ण कडबा खाक होऊन अंदाजे २० हजार रुपयांचे नुकसान झाले.
त्यांच्यापुढे पाळीव जनावरांच्या चाऱ्याचे संकट उभे राहिले आहे. याकरिता शासनाकडून आर्थिक मदत करावी, अशी विनंती ग्रामस्थांच्या वतीने निवेदनाद्वारे शासनाककडे करण्यात आली आहे. दरम्यान अंदुरा येथील भाग १ व २ चे तलाठी गजानन भागवत, सतीश कराड व कोतवाल राजू डाबेराव यांच्या उपस्थितीत सदर घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे. या घटनेचे अहवाल महसूल विभागाकडे पाठविण्यात आला आहे.