पुणे सीआयडीने सादर केले ९१९ पानांचे दोषारोप पत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2016 02:30 AM2016-09-01T02:30:22+5:302016-09-01T02:30:22+5:30
सहआरोपी कोहलीचा जामीन अर्ज फेटाळण्यासाठी उच्च न्यायालयात अर्ज न्यायप्रविष्ट.
हर्षनंदन वाघ
बुलडाणा, दि. ३१: येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ कार्यालयातील घोटाळाप्रकरणी पुणे येथील सीआयडी पथकाने त पासाअंती बुलडाणा न्यायालयात ९१९ पानांचे दोषारोप पत्र दाखल केले आहे. या प्रकरणातील सहआरोपी पवनदिपसिंग कोहली यांनी जामीन अर्ज फेटाळण्यासाठी नागपूर येथील उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. या प्रकरणी सहआरोपी ताब्यात आल्यास बुलडाण्यातील झालेल्या घोटाळ्यातील मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे.
ऑगस्ट २0१२ ते डिसेंबर २0१४ या काळात अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष असताना आमदार रमेश कदम यांनी कोट्यवधी रुपयांच्या निधीचा घोटाळा केल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. या प्रकरणी त्यांच्यावर राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने गुन्हा दाखल केला होता. या गुन्हय़ाच्या आधारे सप्टेंबर २0१५ मध्ये महासंचालनालयाने काळा पैसा प्र ितबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला होता. गुन्हे अन्वेषण विभागाच्या चौकशीत कदम यांनी इतर सदस्यांच्या मदतीने ३८५ कोटींचा घोटाळा केल्याचे निष्पन्न झाले होते. महामंडळाचा निधी वापरण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार करण्यात आली आणि त्याद्वारे मिळालेला निधी स्वत:च्या फायद्यासाठी वापरला, असेही तपासात निष्पन्न झाले होते. या प्रकरणी आमदार कदम यांना १७ ऑगस्ट २0१५ रोजी अटक केल्यानंतर प्रकरणाशी संबंधित सहआरोपी औरंगाबाद ये थील पवनदिपसिंग महेंद्रसिंग कोहली याच्याविरुद्ध भादंवि ४0९, ४१८, ४२0, १२0 (ब), ४६७, ४६८, ४७१ व ३४ नुसार गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती.
दरम्यान, कोहली यास जिल्हा न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. या प्रकरणी अधिक तपासासाठी पुणे येथील सीआयडी पथकाचे तपास अधिकारी शंकर सलगर यांनी बुलडाण्यात मुख्य आरोपी आमदार राम कदम यास अटक करून तपास केला. या प्रकरणी पूर्ण चौकशी केल्यानंतर तपास अधिकारी शंकर सलगर यांनी बुलडाणा येथील मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात तब्बल ९१९ पानांचे दोषारोप पत्र दाखल केले आहे. या प्रकरणी पुढील त पासासाठी व बुलडाण्यातील घोटाळ्याशी संबंधित आरोपींवर कार्यवाहीसाठी सहआरोपी पवनदिपसिंग महेंद्रसिंग कोहली याचा जामीन अर्ज फेटाळून पुढील तपासासाठी ताब्यात घेण्यासाठी उच्च न्यायालय नागपूर येथे अर्ज दाखल केला असून, तो अर्ज न्यायप्रविष्ट आहे. या प्रकरणाशी संबंधित मुख्य आरोपी रमेश कदम यास मुंबई येथील ऑर्थर रोड कारागृहात ठेवण्यात आले असून, प्रकरणाशी संबंधित इतर आरोपींना ताब्यात दिल्यास सीआयडीच्या पुढील त पासाला वेग येणार आहे.